औरंगाबाद महापालिका निवडणुकीची काँग्रेसने सुरु केली तयारी

औरंगाबाद महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रदेश कॉंग्रेस कमिटीने औरंगाबादचे संपर्कमंत्री व राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या नेतृत्वात गांधी भवन येथे बैठक पार पडली
Dheeraj Deshmukh - Amit Deshmukh
Dheeraj Deshmukh - Amit Deshmukh

मुंबई : देशात आणि राज्यात कॉंग्रेसने अनेकवेळा चढ-उतार बघितले आहेत. राज्यात आता कॉंग्रेस पुन्हा मजबूत होत आहे. गावपातळीपासून राज्यपातळीपर्यंत सर्वांनीच मतभेद संपवून आगामी निवडणुकीत कॉंग्रेसचा तिरंगा फडकवण्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे.

औरंगाबाद महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रदेश कॉंग्रेस कमिटीने औरंगाबादचे संपर्कमंत्री व राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या नेतृत्वात गांधी भवन येथे बैठक पार पडली. या बैठकीला प्रदेश कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन, आमदार राजेश राठोड, आमदार धीरज देशमुख, माजी आमदार एम. एम. शेख, माजीमंत्री अनिल पटेल, प्रदेश सरचिटणीस प्रकाश मुगदिया, मागासवर्गीय विभागाचे कार्याध्यक्ष डॉ. जितेंद्र देहाडे, जिल्हाध्यक्ष डॉक्‍टर कल्याण काळे, शहराध्यक्ष हिमेश उस्मानी, माजी आमदार नामदेव पवार, निवडणुकीसाठी नियुक्त केलेले निरीक्षक दादासाहेब मुंडे, माजी महापौर अशोक सायन्ना, माजी अध्यक्ष इब्राहिम पठाण, महिला अध्यक्ष सीमाताई थोरात, श्रीमती पानखडे, आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला शहराध्यक्ष उस्मानी यांनी निवडणुकीसंदर्भात पक्षाची भूमिका विषद केली. जिल्हाध्यक्ष डॉक्‍टर कल्याण काळे यांनी औरंगाबाद शहरात सामाजिक समीकरणाबरोबरच सरकारच्या ध्येयधोरणांची चर्चा अधिक करावी लागेल हे नमूद केले. अनिल पटेल यांनी संघटित काम केल्यास कॉंग्रेस पक्षाला महापालिका निवडणुकीत यश मिळेल असे सांगत विलासराव देशमुख यांचा विचार अनेक कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारे आहे. तोच विचार घेत वाटचाल करणारे अमित देशमुख हे योग्य नेतृत्व करतील, असे सांगत अशोक सायन्ना, इब्राहिम पठाण, जितेंद्र देहाडे,एम एम शेख, नामदेव पवार, राजेश राठोड यांनी आपले विचार व्यक्त केले.

संघटनात्मक बाबतीत पक्ष जो निर्णय घेईल तिथे काम करण्याची माझी तयारी आहे. मी पन्नास वर्षापासून कॉंग्रेस पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन काम करतो अशा भावना प्रकाश मुगदिया यांनी व्यक्त केल्या. कॉंग्रेस पक्षाच्या जवळ सर्व प्रकारची माणसे आहेत. मात्र युवकांची वाणवा असल्यामुळे या युवकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत आमदार धीरज देशमुख यांनी व्यक्त केले.
Edited By- Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com