भाजप नेत्या पंकजा मुंडेंना कोरोनाची लागण  - BJP leader Pankaja Munde infected with corona | Politics Marathi News - Sarkarnama

भाजप नेत्या पंकजा मुंडेंना कोरोनाची लागण 

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 29 एप्रिल 2021

बीडच्या भाजप खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी नुकतीच सोशल मीडियावर आपली तब्यत बरोबर नसल्याचे सांगितले होते.

बीड : भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतःहा ट्वीट करत ही माहिती दिली आहे. त्यांनी कोरोना चाचणी केली होती ती पॉझिटिव्ह आली आहे. त्यांच्यावर घरीच उपचार सुरु आहेत.  

पंकजा मुंडे आपल्या ट्वीटमध्ये म्हणाल्या की, ''माझ्या कोरोनाचा चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी आधीच सावधगिरी बाळगून आधिपासूनच विलिगिकरणात आहे. मी गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या बऱ्याच कुटुंबियांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. त्याच वेळी कदाचित मला कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असेल. त्यामुळे या काळात जे कोणी माझ्या संपर्कात आले आहेत. त्यांनी स्वत:ची कोरोना चाचणी करुन घ्यावी. व काळजी घ्या, असे मुंडे यांनी म्हटले आहे.

परमबीरसिंग यांच्यासह २७ पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा: अॅट्रॅासिटीसहन गुन्हेगारांना मदतीचा ठपका

दरम्यान, बीडच्या भाजप खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी नुकतीच सोशल मीडियावर आपली तब्यत बरोबर नसल्याचे सांगितले होते. या सोबत आपली कोरोना टेस्ट निगेटीव्ह आल्यामुळे घाबरण्याचे कारण नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. त्यांच्या या सोशल मडियावरील संदेशानंतर राज्याचे सामाजिक न्याय मंत्री व बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या बहिणीला एक भावनिक सल्ला दिला आहे. ताई टेस्ट निगेटीव्ह आली असली तरी डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य उपचार व काळजी घेण्यास सांगितले आहे.

नरहरी झिरवळ का सांगताहेत, मी जिवंत आहे बघा!
 

या संदर्भात धनंजय मुंडे यांनी केलेल्या एक ट्विटची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होत आहे. बीड आणि राज्याच्या राजकारणात बहिण-भाऊ असलेल्या धनंजय, पंकजा व प्रीतम मुंडे यांच्यातील कौटुंबिक संबंध अजूनही जिव्हाळ्याचे आणि एकमेकांची काळजी घेणार असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली तेव्हा मुंडे भगिनींनी आपल्या भावाबद्दल काळजी व्यक्त करत सदिच्छा व्यक्त केल्या होत्या. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख