महाविकास आघाडीतल्या पक्षांचे गुण जुळत नाहीत : पंकजा मुंडेंची टीका

सरकार मधील तीन पक्षांचे गुण एकमेकांशी जुळत नसल्याची खोचक टीका माजी मंत्री व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केली आहे. पंकजा मुंडे हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील सभेत बोलत होत्या. पदवीधर निवडणुक निकालानंतर सरकार कोसळणार असल्याचेही त्या म्हणाल्या.
Pankaja Munde BJP
Pankaja Munde BJP

हिंगोली : गेल्या वर्षभरात महाविकास आघाडी सरकारने केवळ विकास कामे रोखण्याचे काम केल असून,  सरकार टिकवण्यासाठी सत्ताधारी मंडळी धडपड करत असल्याचे सांगत, सरकार मधील तीन पक्षांचे गुण एकमेकांशी जुळत नसल्याची खोचक टीका माजी मंत्री व भाजप नेत्या पंकजा  मुंडे यांनी केली आहे.  पंकजा मुंडे हिंगोली जिल्ह्यातील औंढा  नागनाथ येथील सभेत बोलत होत्या. पदवीधर निवडणुक निकालानंतर सरकार कोसळणार असल्याचेही त्या म्हणाल्या.

परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथेही पंकजा मुंडे यांनी सभा घेतली. यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसवाल्यांनी जातीचे कार्ड चालवू नये, असा इशारा त्यांनी दिला. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्यात पोहोचलाय,आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाच्या नेत्यांकडून आरोप- प्रत्यारोपाच्या फेऱ्या सुरू आहेत. माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस वर हल्लाबोल केला.

त्या म्हणाल्या, "हल्ली राष्ट्रवादीवाले प्रचारात कुठेही दिसत नाहीत. जसा आम्ही प्रचार करतो तसा ते प्रचार करत नाही. आपल्या शिवाय दुसरा कुणी निवडूनच येत नाही, असा त्यांना विश्वास आहे की काय हे माहित नाही. आपण आपली जातीची कार्ड चालवू, असे त्यांना वाटतंय. पण बाबांनो अशी जातीची कार्ड चालवू नका, असे माझे सांगणे आहे,"

दरम्यान, हिंगोलीत आमदार नितेश राणे यांनी महाविकास आघाडी वर जहरी टीका करत सरकारला मोगलांची उपमा दिली. गेल्या वर्षभरापासून सत्तेत आलेल्या तीन पक्षांच्या सरकारने, मराठा आरक्षणासह मराठ्यांच्या इतर योजनांवर गदा आणली आहे. या सरकारने मराठ्यांवर जितके वार केलेत, तितके वार पन्नास वर्षात देखील झाले नव्हते.  त्यामुळे या महाविकास आघाडी सरकार पेक्षा मोगलाई परवडली असे म्हणत राणे यांनी येणाऱ्या पदवीधर निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.  
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com