'नौटंकी सेने'ला निवडणुका आल्यावरच औरंगाबादचे नामांतर कसे सुचते..कदमांचा टोला - Aurangabad Politic BJP leader Ram Kadam criticizes ShivSena | Politics Marathi News - Sarkarnama

'नौटंकी सेने'ला निवडणुका आल्यावरच औरंगाबादचे नामांतर कसे सुचते..कदमांचा टोला

सरकारनामा ब्युरो
रविवार, 3 जानेवारी 2021

औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करायचे की नाही, यावरून राजकाऱण पेटले आहे. भाजपचे नेते राम कदम यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

मुंबई : औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करायचे की नाही, यावरून राजकाऱण पेटले आहे. भाजपचे नेते राम कदम यांनी यावरून शिवसेनेवर टीका केली आहे. निवडणुका जवळ आल्यावरच औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करावे, कसे सुचते, असा सवाल राम कदम यांनी उपस्थित केला आहे. याबाबत राम कदम यांनी टि्वट केलं आहे. 

आपल्या टि्वटमध्ये राम कदम म्हणतात, ''औरंगाबाद शहराचे नामकरण #संभाजीनगर करणे हे #शिवसेनेला संभाजीनगरच्या महापालिका निवडणुका जवळ आल्यावरच कसे सुचते ? महाराष्ट्रत आमच्या सोबत सत्तेत असताना #औरंगाबाद महापालिकेत शिवसेनेची सत्ता असूनही त्यांनी नामकरणाचा प्रस्ताव सरकारकडे का पाठविला नाही ? अर्थ स्पष्ट आहे नौटंकी सेना''

औरंगाबादचे संभाजीनगर करायचे, असे मुख्यमंत्री म्हणालेत काय?
औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करायचे की नाही याबाबत मी आमच्या प्रदेशाध्यक्षांच्या मताशी सहमत आहे, अशी भूमिका सार्वजनिक बांधकाकमंत्री अशोक चव्हाण यांनी मांडली. मुख्यमंत्री उद्धव हे जेव्हा याविषयी बोलतील आणि जेव्हा हा विषय सरकारकडे येईल तेव्हा बसून ठरवू, असे त्यांनी काल येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. औरंगाबादच्या नामांतरावरून सध्या महाविकास आघाडीत कुरबूर सुरू आहे. शिवसेनेने या नामांतराला पाठिंबा दिला आहे तर दुसरीकडे औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्यास काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोध केला आहे.

 बाळासाहेब थोरात काय म्हणाले होते?
नामांतराच्या प्रश्नावर बोलताना बाळासाहेब थोरात यांनी तीन दिवसांपूर्वी काॅंग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट केली होती. निवडणुका आल्या की लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी भावनिक मुद्दे उकरून काढले जातात. ही काही मंडळींची पद्धत आहे. मात्र, काँग्रेस आणि शिवसेना या चालीला फसणार नाहीत. नाव बदलल्याने सामान्य माणसाचं जीवन बदलत नाही. उत्तर प्रदेशमध्ये शहरांची नावं बदलून काय झालं, हे पाहिलं पाहिजे. सामान्य माणसाचे भले कसे होईल, यादृष्टीने आपण वाटचाल केली पाहिजे. त्यामुळे आपलं उद्दिष्ट काय आणि आपण कशी वाटचाल करायची याबाबत संबंधितांशी चर्चा करु. उत्तर प्रदेशमध्ये शहरांची नावं बदलून काय झालं, हे पाहिलं पाहिजे. सामान्य माणसाचे भले कसे होईल, यादृष्टीने आपण वाटचाल केली पाहिजे. त्यामुळे आपलं उद्दिष्ट काय आणि आपण कशी वाटचाल करायची याबाबत संबंधितांशी चर्चा करु, असे मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले होते.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख