संजय राठोड मंत्रीमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहणार - Sanjay Rathod to attend Cabinet Meeting Today in Mumbai | Politics Marathi News - Sarkarnama

संजय राठोड मंत्रीमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहणार

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 24 फेब्रुवारी 2021

मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी आज संजय राठोड हे यवतमाळहून रवाना झाले आहेत. आपण मंत्रिमंडळाच्या बैठकीत सामील होणार असं त्यांनी स्पष्ट केले. शरद पवार हे नाराज असल्ल्याच्या प्रश्नावर त्यांनी उत्तर देणे टाळले . नागपूरहून ते सकाळी साडेअकराचे विमान पकडून ते मुंबईला पोहचणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 

यवतमाळ : मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी आज संजय राठोड हे यवतमाळहून रवाना झाले आहेत. आपण मंत्रिमंडळाच्या बैठकीत सामील होणार असं त्यांनी स्पष्ट केले. शरद पवार हे नाराज असल्ल्याच्या प्रश्नावर त्यांनी उत्तर देणे टाळले . नागपूरहून ते सकाळी साडेअकराचे विमान पकडून ते मुंबईला पोहचणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 

टीकटाॅक स्टार पूजा चव्हाण हिचा मृत्यूशी वनमंत्री संजय राठोड यांचे नाव जोडले जात आहे. विरोधी पक्षांनी राठोड यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. काल पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड काल अखेर जनतेसमोर आले. पोहरादेवी येथे ते कुटूंबासह आले होते. 

दरम्यान, गोरबंजारा समाजातील मुलगी पूजा चव्हाण हीचा पुणे शहरातील वानवाडी परिसरात मृत्यू झाला. तिच्या मृत्यूचे दुःख मला, माझ्या कुटुंबीयांना आणि संपूर्ण बंजारा समाजाला आहे. पण या घटनेनंतर माझ्यावर विरोधकांकडून बिनबुडाचे आरोप करण्यात आले. अतिशय घाणेरडं राजकारण केले जात आहे. ते अतिशय चुकीचं आणि निराधार आहे. माझ्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप खोटे आहेत. या एका घटनेमुळे मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करू नका, असे राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी काल पोहरादेवी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. 

बिड जिल्ह्याच्या परळी येथील टिकटॉक स्टार पूजा चव्हाण हीचा पुणे येथे वानवडी परिसरात ८ फेब्रुवारीला मृत्यू झाला. त्यानंतर राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्यावर विरोधकांकडून विविध आरोप करण्यात आले. आज १५ दिवसांनंतर ते वाशीम जिल्ह्याच्या मानोरा तालुक्यातील बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी येथे पत्नी आणि साळा सचिन नाईक यांच्यासह दर्शनासाठी गेले होते. तेथे त्यांनी संत सेवालाल महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. महंत सुनील महाराज यांनी त्यांच्यासाठी तेथे हवन केला. तेथे मंत्री राठोड माध्यमांशी बोलणार की नाही, याबद्दलही साशंकता होत. पण ते माध्यमांसमोर आले आणि एका घटनेमुळे मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करू नका, असे माध्यमांना सांगितले. 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख