..तर वीज अधिकाऱ्यांना फटके बसतील; तुपकरांचा अल्टीमेटम

'स्वाभिमानी'चे नेते रविकांत तुपकर यांनी आज बुलडाणा महावितरणचे अधिक्षक अभियंता दीपक देवहाते यांची भेट घेवून त्यांनाअल्टीमेटम दिला.
Ravikant Tupkar
Ravikant Tupkar

बुलडाणा : 'स्वाभिमानी'चे नेते रविकांत तुपकर यांनी आज  बुलडाणा महावितरणचे अधिक्षक अभियंता दीपक देवहाते यांची भेट घेवून त्यांना  अल्टीमेटम दिला. या काळात कोणत्याही ग्राहकाचे वीज कनेक्शन कापाल तर याद राखा...संघर्ष अटळ आहे. अधिकारी कर्मचाऱ्यांना फटके बसतील..असे रविकांत तुपकरांनी ठणकावून सांगितले.

महावितरणने सध्या वीज कनेक्शन कापायचा सपाट लावला आहे. लॉकडाऊन काळातील विजबील माफ करायचे सोडून सध्या जबरदस्ती वसुली सुरू आहे. उर्जामंत्र्यांनी पहिले विजबिल माफीचे सूतोवाच केले व नंतर घूमजाव केला आणिआता जबरदस्ती वसुली सुरू आहे..! हे खपवून घेतले जाणार नाही..! असे रविकांत तुपकर यावेळी म्हणाले

सध्या जिल्ह्यात मिनी लॉकडाऊन आहे तर विजबिले भरणार कशी..? यापुढे कुणीही वीज कनेक्शन कापायला अधिकारी - कर्मचारी आला तर 'स्वाभिमानी'च्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना फक्त कळवा..असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले व जे कर्मचारी कनेक्शन कट करण्यासाठी येतील 'त्या' कर्मचारी - अधिकाऱ्यास 'स्वाभिमानी' स्टाईलने धडा शिकवू..! असा इशाराही तुपकरांनी यावेळी दिला..
Edited By - Amit Golwalkar
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com