भाजप आमदार संजय कुटेंच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न - BJP workers protested MLA Sanjay Gaikwad's statement | Politics Marathi News - Sarkarnama

भाजप आमदार संजय कुटेंच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 19 एप्रिल 2021

आरोपीला अटक करा या मागणिसाठी भाजप कार्यकत्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या कार्यल्यासमोरच गोंधळ घालत मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली.

बुलडाणा : भारतीय जनता पक्षाचे आमदार संजय कुटे यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला गेला. त्याच्या निषेधार्थ भाजप आमदार संजय कुटे, आमदार श्वेता महाले, माजी आमदार विजयराज शिंदे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी बुलडाणा शहरातून रैली काढून आरोपीला अटक करण्याची मागणी केली. भाजपच्या या रॅलीमुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला.  

भाजपच्या कार्यकर्त्यांनी कोरोना नियमाचे उल्लंघन केले. आरोपीला अटक करा या मागणिसाठी भाजप कार्यकत्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या कार्यल्यासमोरच गोंधळ घालत मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली. यावेळी मात्र, पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली होती.

हे ही वाचा :  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेस पंतप्रधान नरेंद्र मोदीच जबाबदार!

शनिवारी शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी ''जर मला कोरोनाचा जंतू सापडला असता तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबला असता''! असे वकत्व्य केले होते. त्यावर भाजपने आमदार संजय गायकवाड यांना उद्या धडा शिकवणार असल्याचे सांगितले होते. रविवारी दुपारी भाजपच्या कार्याकर्त्यांनी गायकवाड यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यावेळी शिवसेनेच्या कार्याकर्त्यांनी भाजपचे माजी आमदार विजयराज शिंदे यांनाच मारहाण केली होती.  

त्यानंतर आज आमदार संजय कुटे यांच्या गाडीवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला गेला. याचा निषेध भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी एकत्रित येत केला. जिल्हा पोलिस अधीक्षक यांची भेट घेऊन निवेदन देण्यासाठी भाजप आमदार संजय कुटे हे शेकडो कार्यकर्त्यांसह बुलडाणा शहरात दाखल झाले होते. जिल्ह्याधिकारी व पोलिस अधीक्षक कार्यलयसमोर भाजप कार्यकर्ते यानी एकत्रित येत शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली.

माझ्या गाडीवर बुलडाणा येथे आमदार संजय गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी भ्याड हल्ला केला. आता मी गायकवाड यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होऊन त्यांना अटक होत नाही. तोपर्यंत मी बुलडाणा शहर सोडणार नाही, मी परत बुलडाणा शहरात येतोय हिम्मत असेल मला अडवून दाखवा, असा इशारा आमदार संजय कुटे यांनी दिला आहे.

आमदार गायकवाड काय म्हणाले होते? 

''फक्त राज्यात नव्हे तर संपूर्ण देशभर कोरोनामुळे हाहाकार उडाला आहे. भारतीय जनता पक्ष यावेळी मदत करायचे सोडून राजकारण करत आहे'', असा आरोप गायकवाड यांनी केला होता. तसेच यावेळी त्यांनी एकेरी भाषेचा वापर करत देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि प्रवीण दरेकर यांचा खरपूस समाचार घेतला. ''जर मला कोरोनाचा जंतू सापडला असता तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबला असता''!

हे ही वाचा : पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत 'करेक्ट कार्यक्रम' कुणाचा?

 ''महाराष्ट्रात कोरोना साथीचा कहर सुरु आहे. या संकट काळात केंद्रातले नरेंद्र मोदी सरकार सहकार्य करण्याऐवजी उलट कोंडी करत आहे. तर महाराष्ट्रातील भाजपची मंडळी खिल्ली उडवीत आहे. भाजपच्या लोकांचे नीच राजकारण उभा महाराष्ट्र पाहत आहे. असा आरोप गायकवाड यांनी केला होता. राज्यसरकारला मदत करायचे सोडून बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळला मदत केली आहे. गुजरातला रेमडेसिव्हिर इंजेक्शन मोफत वाटले. कोरोना काळात कोणीच राजकारण करु नये'', असा टोला गायकवाड यांनी फडणवीसांना लगावला होता.

''जर का माणसेच जिवंत राहिली नाही तर तुम्हाला मतदान कोण करणार असा प्रश्न तुम्ही सरकारला विचारत आहात. त्याशिवाय तुम्ही तर सरकार पाडायला निघाले आहात. मात्र अगोदर माणसे जिवंत ठेवा, मगच राजकारण करा, असे आवाहनही त्यांनी भाजपला केले होते. ज्याचा घरातील माणूस कोरोनाने मरतो त्यालाच माहित कि कोरोना काय आहे''. मात्र भाजपवाल्यांना याची जाण नाही, असे गायकवाड म्हणाले होते.  

Edited By - Amol Jaybhaye 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख