अनिल बोंडे व पोलिसांमध्ये बाचाबाची; दोघेही एकमेकांना म्हणाले ''तुम्ही कुत्रे"!

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पाचव्यांदा रद्द केल्यानं राज्यभरात विद्यार्थी संतप्त झाले आहे. अमरावतीतही काल विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यावेळीमाजी मंत्री व भाजपचे नेते अनिल बोंडे व पोलिस अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच शाब्दिक वादावादी झाली.
Anil Bonde Scuffle with police officers in Amravaiti
Anil Bonde Scuffle with police officers in Amravaiti

अमरावती :  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पाचव्यांदा रद्द केल्यानं राज्यभरात विद्यार्थी संतप्त झाले आहेत. अमरावतीतही काल विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यावेळी माजी मंत्री व भाजपचे नेते अनिल बोंडे व पोलिस अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच शाब्दिक वादावादी झाली. बोंडे यांनी पोलिसांना 'सरकारचे कुत्रे' असे हिणवले. त्यावर पोलिसांनीही 'तुम्हीही कुत्रेच आहात,' असे प्रत्युत्तर बोंडे यांना दिले. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा रद्द झाल्यानं अमरावती शहरातील अभ्यासिकेत अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अमरावती शहरातील गाडगेनगर चौक येथे काल चक्का जाम आंदोलन केले होते. तसेच सरकारच्या विरोधात घोषणाबाजीही केली. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी पोलीस बळाचा वापर केला. तसेच सौम्य लाठीचार्ज केला. त्यावेळी बोंडे व पोलिसांमध्ये बाचाबाची झाली.

याचा व्हिडिओ बोंडे यांनी आपल्या ट्वीटरवरुन शेअर केला आहे. आम्ही सरकारकडे मागणी करतो आहोत, तुमच्याकडे नाही असे सांगितल्यावर पोलिस अधिकारीही भडकले. तुम्ही आंदोलन करता आणि आम्हाला नियंत्रण आणावे लागते. तुम्ही आम्हाला शहाणपण शिकवू नका, असे पोलिसांनी बोंडे यांना सुनावले. त्यावर पोरा-पोरींना आतमध्ये कोंडता, तुम्हाला समजत नाही का, अशी विचारणा बोंडे यांनी केली. त्यावेळी पोलिसांची आणि त्यांची बाचाबाची झाली. संतापलेल्या बोंडेंनी पोलिसांना सरकारचे कुत्रे असे हिणवले. त्यावर तुम्हीही कुत्रेच आहात, असे पोलिसांनी प्रत्युत्तर दिले. संतापलेल्या पोलिसांनी नंतर बोंडेंना ताब्यात घेतले.  बोंडे आणि चाणक्य फाऊंडेशनचे शिक्षक मिलिंद लाहे यांनाही पोलिसांनी अटक केली. 

राज्याचे माजी कृषीमंत्री यांच्याशी जबाबदार पोलिस निरिक्षक चोरमाले गैरवर्तन करतात,त्यांना अपशब्द वापरतात,त्यांच्यावर चिथावल्या सारखे ओरडतात,लोकप्रतिनिधिंना ढकलण्याचाही प्रकार होतो. तर त्यांनी विदयार्थ्यांना कशी वागणूक दिली असेल यांनी? याची चौकशी करणार का मा गृहमंत्री अनिल देशमुखजी, अशी विचारणा बोंडे यांनी ट्वीटद्वारे केली आहे. 
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com