बीड प्रशासनातून गेलेले IAS अधिकारी आंतरराष्ट्रीय सेवेत, मुख्य सचिव, राज्यपालही.. - IAS Officers who have passed through the administration of Beed in the International Service, Governor | Politics Marathi News - Sarkarnama

बीड प्रशासनातून गेलेले IAS अधिकारी आंतरराष्ट्रीय सेवेत, मुख्य सचिव, राज्यपालही..

दत्ता देशमुख   
सोमवार, 29 मार्च 2021

साताराचे खासदार असलेले श्रीनिवास पाटील व सध्या पंतप्रधान कार्यालयात उपसचिव असलेले नवल किशोर राम यांनी देखील बीडचे जिल्हाधिकारी उत्तम प्रशासन चालविले. 

बीड: २५ ते ३० वर्षे वयाच्या दरम्यान भारतीय प्रशासन सेवेत (आयएएस) निवड झालेले अधिकारी बड्या हुद्द्यावर जातातच. अशाच बड्या हुद्द्यांवर पोचलेले अनेक अधिकाऱ्यांनी बीडच्या प्रशासनात जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले. कोणी आंतरराष्ट्रीय दुतावासात, कोणी केंद्रात गृहसचिव, कोणी राज्याचे मुख्य सचिव तर कोणी राज्यपालपदांपर्यंतही मजल मारली. विशेष म्हणजे सध्याचे राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे व त्यापूर्वीचे संजय कुमार या दोघांनीही बीडचे जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे हे विशेष. तर, साताराचे खासदार असलेले श्रीनिवास पाटील व सध्या पंतप्रधान कार्यालयात उपसचिव असलेले नवल किशोर राम यांनी देखील बीडचे जिल्हाधिकारी उत्तम प्रशासन चालविले. 

जिल्हाधिकारी पदावर आयएएस (भारतीय प्रशासन सेवा) अधिकारीच असतात. मग ते थेट परीक्षेतून निवड झालेले असोत वा पदोन्नतीनंतर त्यांना आयएएस केडर मिळालेले असो. तर, जिल्ह्याच्या ठिकाणचे दुसरे महत्वाचे पद म्हणजे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी. या पदावरही याच दर्जाचे अधिकारी असतात. अपवादात्मक परिस्थिती एमडीएस (राज्य विकास सेवा) केडरच्या अधिकाऱ्यांना नियुक्ती दिली जाते. थेट युपीएससी (केंद्रीय लोकसेवा आयोग) कडून घेतलेलेल्या परीक्षेतून आयएएस अधिकाऱ्यांना साधारण तीन ते चार वर्षांनी वरील दोन्ही पदे मिळतात. २५ ते ३० वर्षे वयादरम्यान या पदांवर आलेली मंडळी नंतर बड्या हुद्द्यांवरुनच निवृत्त होते. 

असे अनेक बड्या हुद्द्यांवर पोचलेले अधिकारी बीडच्या प्रशासनाला लाभले. 
साधारण ६० च्या दशकात बीडच्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहीलेले रंगनाथन नंतर राज्याचे मुख्य सचिव होते. तर, १९८० ते ८१ या काळात बीडचे जिल्हाधिकारी राहीलेले सुंदर एस. बुर्रा नंतर आंतरराष्ट्रीय सेवेत गेले. १९८८ ते १९९१ या काळात जिल्हाधिकारी म्हणून काम केलेले कल्याणेश्वर प्रसाद बक्षी यांनी केंद्रीय गृहसचिवापर्यंत मजल मारली. २०१३ ते २०१७ या काळात साडेतीन वर्षे जिल्हाधिकारी म्हणून बीडचे प्रशासन उत्तम सांभाळणारे नवल किशोर राम यांना देखील केंद्र सरकारने बोलावून पंतप्रधान कार्यालयाचे उपसचिवपदाची धुरा त्यांच्या खांद्यावर दिली. 

सिक्कीमचे राज्यपालपद भूषविणारे आणि आता सातारचे खासदार असलेले श्रीनिवास पाटील यांनी देखील बीडचे जिल्हाधिकारी म्हणून काम केलेले आहे. सध्याचे राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे देखील १९९६ मध्ये बीडचे जिल्हाधिकारी होते. तर, यापूर्वीचे मुख्य सचिव संजय कुमार यांनीही याच पदावर बीडला काम केलेले आहे. औरंगाबादचे विभागीय आयुक्त असलेले सुनिल केंद्रेकर देखील २०१२ - १३ या काळात बीडचे जिल्हाधिकरी होते. त्यांच्या दबंग कारवाया आणि त्यांच्या बदलीसाठी बीडकरांनी केलेला उठाव कायम स्मरणात राहणारा आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख