सीबीआय चौकशीत सचिन वाझे आज काय बाँब टाकणार? - CBI to Conduct Inquiry of Sachin Wase Today | Politics Marathi News - Sarkarnama

सीबीआय चौकशीत सचिन वाझे आज काय बाँब टाकणार?

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 9 एप्रिल 2021

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी करण्यास सीबीआयला काल सर्वोच्च न्यायालयाकडून ग्रीन सिग्नल मिळाला आहे. आज सीबीआयचे पथक एनआयएच्या कार्यालयात गेले असून तिथे हे अधिकारी सचिन वाझेकडे परमबीरसिंग यांच्या पत्राबाबत चौकशी करणार आहेत. 

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग Parambir Singh यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख Anil Deshmukh यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी करण्यास सीबीआयला काल सर्वोच्च न्यायालयाकडून ग्रीन सिग्नल मिळाला आहे. आज सीबीआयचे पथक एनआयएच्या कार्यालयात गेले असून तिथे हे अधिकारी सचिन वाझेकडे परमबीरसिंग यांच्या पत्राबाबत चौकशी करणार आहेत. CBI to Conduct Inquiry of Sachin Wase Today

दोन दिवसांपूर्वी सीबीआयने CBI वाझेची चौकशी करण्यासाठी न्यायालयात परवानगी मागितली होती. ही परवानगी मिळाल्यानंतर आज हे अधिकारी एनआयएच्या NIA कार्यालयात गेले आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांन दिलासा देण्यास सर्वोच्च न्यायालयाने काल नकार दिला.

त्यामुळे मुंबईचे Mumbai माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंह यांनी 100 कोटींच्या हप्तेबाजीच्या केलेल्या आरोपाची सीबीआय चौकशी सुरू राहणार असल्याचे स्पष्ट झाले. उच्च न्यायालयाने या चौकशीचा आदेश दिल्यानंतर देशमुख यांनी या प्रकऱणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. दुसरीकडे राज्य सरकारनेही अपील करत ही चौकशी रोखण्याची मागणी केली होती. 

सचिन वाझे यांच्यामार्फत शंभर कोटी रुपये वसुलीचे टार्गेट अनिल देशमुख यांनी ठेवले होते, असा खळबळजनक आरोप परमबीरसिंग यांनी केला होता. त्यानंतर सचिन वाझे यांनी एनआयए न्यायालयात अनिल देशमुख यांनी आपली नियुक्ती रद्द होऊ नये यासाठी दोन कोटी रुपयांची मागणी केल्याचा नवा आरोप परवा न्यायालयाला दिलेल्या पत्रकात केला. CBI to Conduct Inquiry of Sachin Wase Today

या आरोपांवरून राज्यात राजकीय गदारोळ उडाला आहे. वाझे यांनी परिवहनमंत्री अनिल परब यांचेही नाव या पत्रात घेत त्यांनीही शंभर कोटी वसुली करून देण्यास सांगितले होते, असे या पत्रात म्हटले. त्यावरून परब यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपने केली होता.  
Edited By - Amit Golwalkar
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख