जेव्हा पालिकेचे सहायक आयुक्त विचारतात....राहुल गांधी येणार आहेत का?

नागरिकांच्या समस्या सांगण्यासाठी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष येत असल्याचे पदाधिकाऱ्यांने सांगताच राहुल गांधी येत आहेत काय? असे अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या सहायक आयुक्तांच्या विरोधात संतप्त झालेल्या कॉंग्रेसने अधिकाऱ्यांची खुर्ची बाहेर काढून कार्यालयाला टाळे ठोकले. हा प्रकार रविवारी सायंकाळी प्रभाग समिती २ च्या कार्यालयात घडला.
Ulhasnagar Municipal Corporation
Ulhasnagar Municipal Corporation

उल्हासनगर : नागरिकांच्या समस्या सांगण्यासाठी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष येत असल्याचे पदाधिकाऱ्यांने सांगताच राहुल गांधी येत आहेत काय? असे अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या सहायक आयुक्तांच्या विरोधात संतप्त झालेल्या कॉंग्रेसने अधिकाऱ्यांची खुर्ची बाहेर काढून कार्यालयाला टाळे ठोकले. हा प्रकार रविवारी सायंकाळी प्रभाग समिती २ च्या कार्यालयात घडला.

उत्तर भारतीय सेलचे अध्यक्ष अनिल सिन्हा हे दोनदा प्रभाग समिती २ चे सहायक आयुक्त अनिल खतुरानी यांच्याकडे नागरी समस्या घेऊन गेले होते. प्रथम भेटण्यास नकार देणाऱ्या खतुरानी यांनी दुपारी सिन्हा यांना बोलावले होते. दुपारच्या सुमारास अनिल सिन्हा हे कार्यालयात गेले असता खतुरानी हे कार्यालयातून बाहेर पडत होते. त्यावेळी आमचे उल्हासनगर कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष रोहित साळवे हे आपल्या भेटीसाठी येत आहेत. थोडे थांबा असे सिन्हा यांनी खतुरानी यांना सांगताच राहुल गांधी येत आहेत काय? असे अपमानास्पद वक्तव्य खतुरानी यांनी केले आणि ते निघून गेले.

याप्रकाराने संतप्त झालेले जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी खतुरानी यांची खुर्ची बाहेर फेकून कार्यालयाला टाळे ठोकले. यावेळी ऍडव्होकेट सचिन गांधी,अनिल सिन्हा, राजू बविस्कार, शंकर अहिरे, सोनू परिहार आदी उपस्थित होते.

राहुल गांधी यांचे नाव घेण्याची खतुरानी यांची लायकी नाही. त्यांना भूमाफिया, ठेकेदार यांना भेटण्यासाठी वेळ आहे, पण सामान्य नागरिकांसाठी नाही. असा अधिकारी या सन्मानपूर्वक खुर्चीसाठी अयोग्य असून त्यांची तात्काळ बदली करावी, यासाठी कॉंग्रेसच्या मंत्र्यांकडे मागणी करणार असल्याचे रोहित साळवे यांनी सांगितले.

बैठकीसाठी जात असताना गोंधळ -
यासंदर्भात अनिल खतुरानी यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. मुख्यालय उपायुक्त मदन सोंडे यांच्याशी विचारणा केली असता, खतुरानी हे पालिकेत बैठकीसाठी जात असताना कॉंग्रेसने गोंधळ घातल्याचे सांगितले.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com