अंबरनाथ मधील माजी नगरसेवकाला ठार मारण्यासाठी आलेले ३ जण अटकेत

येथील माजी नगरसवेक लेलीन मुक्स यांची हत्या करण्याची सुपारी घेऊन आलेल्या तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून शस्त्रे, तलवार आदी वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत
Three Arrested For By Ambranath Police for Murder Attempt of Corporaotr
Three Arrested For By Ambranath Police for Murder Attempt of Corporaotr

अंबरनाथ : येथील माजी नगरसवेक लेलीन मुक्स यांची हत्या करण्याची सुपारी घेऊन आलेल्या तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून शस्त्रे, तलवार आदी वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.

अंबरनाथ पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार अंबरनाथच्या पश्चिमेस असलेल्या फुले नगर कॉम्प्लेक्स दोन संशयित व्यक्ती रोज येत असून त्यांच्या कडे हत्यार सुद्धा आहेत ही माहिती मिळताच अंबरनाथ पोलिसांनी सापळा रचला. मात्र पोलिस पाहताच त्या दोन व्यक्तींनी पळ काढला. दरम्यान पळताना पोलिसांनी या दोन संशयीताना ताब्यात घेतले असता आपणास फुले नगर काँप्लेक्स मध्ये राहणारे माजी नगरसेवक ललीन मुक्स यांच्या हत्येची सुपारी मिळाली होती, असे त्यांनी सांगितले.  

आरोपींची नावे धीरू बहादूर ,रोहित आयवळे असे असून, या आरोपिनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली  आहे. हा कट रचणारा मुख्य सूत्रधार डी मोहन नामक व्यक्ती फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. अटक केलेल्या तीन आरोपीना न्यायालयाने तिघांना दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक देवरे करीत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com