Breaking - एटीएसला मोठा धक्का; हिरेन मृत्यू प्रकरणाची कागदपत्रे एनआयला देण्याचा आदेश - Thane Court Asks ATS To Handover Hiren Case Probe to NIA | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

Breaking - एटीएसला मोठा धक्का; हिरेन मृत्यू प्रकरणाची कागदपत्रे एनआयला देण्याचा आदेश

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 24 मार्च 2021

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास थांबवून सर्व कागदपत्रे एनआयए कडे सुपूर्द करावीत, असा आदेश ठाणे न्यायालयाने आज एटीएसला दिला. न्यायालयाचा हा आदेश महाराष्ट्र सरकारला मोठा धक्का आहे. हा तपास एनआयएकडे देण्याचा आदेश दोन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहखात्याने दिला होता.

ठाणे : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास थांबवून सर्व कागदपत्रे एनआयए कडे सुपूर्द करावीत, असा आदेश ठाणे न्यायालयाने आज एटीएसला दिला. न्यायालयाचा हा आदेश महाराष्ट्र सरकारला मोठा धक्का आहे. हा तपास एनआयएकडे देण्याचा आदेश दोन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहखात्याने दिला होता. (Thane Court Asks ATS To Handover Hiren Case Probe to NIA)

मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या अँटिलिया बाँब प्रकरणात सचिन वाझे यांना अटक झाली आहे. हे बाँब ठेवण्यासाठी जी गाडी वापरण्यात आली ती हिरेन यांची होती. हे प्रकरण उघडकीला आल्यानंतर हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला. हिरेन यांचा खून वाझे (Sachin Waze) यांनीच केला, असा आरोप हिरेन यांच्या पत्नीने केला होता. त्यानंतर एटीएसने एका निलंबित पोलिसासह दोन जणांना अटक करत या प्रकरणाचे गुढ उलगडल्याचा दावा केला होता. 

आज या प्रकरणातल्या संशयितांची कोठडी मागण्यासाठी एटीएसचे (ATS)अधिकारी ठाणे सत्र न्यायालयात गेले होते. त्यावेळी केंद्र सरकारनं हा तपास एनआयएकडे (NIA)देण्याची अधिसूचना यापूर्वीच काढली आहे, तरीही एटीएस आपला तपास सुरू ठेवत आरोपींची कोठडी का मागत आहे? असा संतप्त सवाल न्यायालयाने केला. मनसूख हिरेन प्रकरणाचा तपास तात्काळ थांबवून सारी कागदपत्रे एनआयएकडे देण्याचे आदेश न्यायालयाने एटीएसला दिले. 

राजकीय वाद निर्माण होण्याचीही होती शक्यता

मनसुख हिरन खुनाचा शोध निर्णायक टप्प्यावर आला असल्याने आता हा तपास एनआयएकडे सोपवण्याची गरज काय असा प्रश्न दहशतवाद प्रतिबंधक दलाने केला होता. तपास यंत्रणातील दोन वेगवेगळ्या संस्था समान विषयावर तपास करत असल्या तरी त्या केंद्र आणि राज्य सरकारच्या अखत्यारीत येत असल्याने त्यास संघर्षाचे आयाम येण्याची शक्यता निर्माण झाली होती. दोन्ही यंत्रणा वेगवेगळ्या किंबहुना परस्परांच्या विरोधातील पक्षांच्या अखत्यारीत येत असल्याने राजकीय वाद निर्माण होण्याचीही शक्यता होती. 

नसुख हिरेन प्रकरणाचा तपास आपल्याकडे घेण्यासाठी 'एनआयए'ला कायद्याचा आधार आहे. एनआयए कायद्यानुसार (The National Security Agency Act,2008)च्या कलम ८ मध्ये याबाबत तरतूद आहे. जर एखाद्या गुन्ह्याच्या प्रकरणाशी संलग्न प्रकरणे असतील तर त्यांचा तपास एनआयए करु शकते, असे या कलमात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. बहुदा त्या आधारेच ठाणे न्यायालयाने एटीएसला तपास थांबवण्याचा आदेश दिला आहे. 
Edieted By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख