सरपंच निवड- दगाफटका टाळण्यासाठी शिवसेनेचे ग्रामपंचायत सदस्य भुमिगत - Than Shivsna Grampanhayat Members gone Underground | Politics Marathi News - Sarkarnama

सरपंच निवड- दगाफटका टाळण्यासाठी शिवसेनेचे ग्रामपंचायत सदस्य भुमिगत

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021

ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुका नुकताच पार पडल्या. या ग्राम पंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण बुधवारी (ता. ३) जाहीर झाले आहे. सरपंचपदाच्या निवडणुकाही लवकरच जाहीर होणार आहेत.

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुका नुकताच पार पडल्या. या ग्राम पंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण बुधवारी (ता. ३) जाहीर झाले आहे. सरपंचपदाच्या निवडणुकाही लवकरच जाहीर होणार आहेत.

त्यामुळे या निवडणुकीच्यावेळी होणारा दगा फटका टाळण्यासाठी पदाचे शिवसेनेने आपल्या तीन ग्रामपंचायतमधील सदस्यांना ग्रामपचांयत निवडणुकीचे निकाल लागण्याच्या आदल्या दिवसापासून भुमिगत केल्याची माहिती समोर आली आहे. तब्बल तीन ग्रामपंचायतमधील सदस्य हे भुमिगत असून त्यांची जबाबादरी ठाण्यातील निष्ठावान शिवसैनिकांच्या खांद्यावर सोपविण्यात आल्याची माहितीही सुत्रंनी दिली.

ठाणे जिल्ह्यातील १५८ ग्रामपंचायतीपैकी १४३ ग्रामपंचायतीसाठी निवडणुका १५ जानेवारी रोजी पार पडल्या. त्यानंतर जानेवारी रोजी याठिकाणी मतमोजणीचा कार्यक्रम पार पडला होता. या निवडणुकीत जीळ्यातीलानेक ग्राम पंचायतींवर भाजपा वरचष्मा दिसून आला. त्यात भिवंडी तालुक्‍यातील महत्वाची मानली जाणाऱ्या काल्हेर ग्रामपंचायतीत भाजपचे सर्वच्या सर्व १७ सदस्य निवडणून आले. तर, भाजप वरचढ ठरल्याचे दिसत आहे. त्यात कल्याण हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. परंतु या भागातील अनेक ग्रामपंचायतीमध्येही भाजप, राष्ट्रवादीचे वर्चस्व दिसून आले आहे. तर मनसेने देखील या ठिकाणी खाते उघडल्यान शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे. 

शहापुरमध्ये शिवसेनेने आपले वर्चस्व कायम राखल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे किमान कल्याण तालुक्‍यातील काही ग्रामपंचायती जे काही स्थान शिवसेनेला मिळाले आहे. ते आबादीत राहावे यामुळे शिवसेनेने येथील म्हारळ, कांबा आणि खोणी ग्रामपंचायतमध्ये निवडुन आलेल्या सदस्यांना भुमिगत केले आहे. विशेष म्हणजे खोणी ग्रामपंचायतमधील सदस्यांना मागील महिन्यात निवडणुकीचा निकाल लागण्याच्या आदल्या दिवसापासून भुमिगत केल्याची माहिती शिवसेनेच्या सुत्रंनी दिली. 

तर उर्वरीत कांबा आणि म्हारळ ग्रामपंचायतमधील सदस्यांना निवडणुकीचा निकाल लागला त्या दिवसापासून भुमिगत करण्यात आल्याचेही सांगितले जात आहे. त्यानुसार २३ सदस्यांना भुमिगत करण्यात आले असून या सदस्यांची सध्या रोजचीच चंगळ सुरु आहे. तसेच हि जबाबदारी ठाण्यातील निष्ठावान शिवसैनिकांकडे सोपविण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख