कोरोना पॉझिटिव्ह  ७० वर्षीय वृद्ध पाऊण तास अँब्युलन्स विना रस्त्यालगत बसून  - Seventy Year Corona Positive Patient Forced to Sit on Road in Kalyan | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोना पॉझिटिव्ह  ७० वर्षीय वृद्ध पाऊण तास अँब्युलन्स विना रस्त्यालगत बसून 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 24 मे 2020

कल्याण पूर्वेतील एकाच घरात दोन कोरोना बाधित रुग्ण सापडले असून त्यांच्या सहवासात आलेल्या त्यांच्या वयोवृद्ध आई-वडिलांना विलगीकरण कक्षात घेऊन जाण्यासाठी आज शनिवारी रात्री एक ॲम्बुलन्स येऊन परत गेल्याने दुसरी ॲम्बुलन्स वेळेत न आल्याने पाऊण तास रस्त्यालगत बसून काढावे लागल्याची घटना समोर आली

कल्याण : डोंबिवली मधील कोरोना बाधित रुग्णाला अब्युलन्स न मिळाल्याने पायी चालत रुग्णालय गाठावे लागले ही घटना ताजी असताना कोरोना पॉझिटिव्ह सहवासी ७० वर्षीय वृद्ध पाऊण तास अब्युलन्स विना रस्त्यालगत बसून राहण्याची घटना कल्याण पूर्व मध्ये समोर आल्याने नागरिकांत संतापाचे वातावरण आहे.

कल्याण पूर्वेतील एकाच घरात दोन कोरोना बाधित रुग्ण सापडले असून त्यांच्या सहवासात वयोवृद्ध आई-वडिलांना यांना विलगीकरण कक्षात घेऊन जाण्यासाठी आज शनिवारी रात्री एक ॲम्बुलन्स येऊन परत गेल्याने दुसरी ॲम्बुलन्स वेळेत न आल्याने पाऊण तास रस्त्यालगत बसून काढावे लागल्याची घटना समोर आली. 

या ७० वर्षीय रुग्णाला चालता येत नसल्याने त्यांना इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून सरपटत खाली  यावे लागले, मात्र अँब्युलन्स एकदा येऊन पुन्हा येण्यास वेळ लागल्याने त्यांना रस्त्यावरच झोपावे लागले. दुपारी एक वाजल्या पासून वाट बघत असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. रात्री अँब्युलन्स आली मात्र ती निघून गेल्याने पुन्हा पाऊण तास रस्त्यावर उभे राहावे लागले.

डोंबिवली घटनेची दखल घेत आयुक्त यांनी पालिकेकडे अँब्युलन्स असल्याचा दावा करत नागरिकानां सुविधा देत असल्याचे सांगितले होते मात्र काही तास होत नाही तोच घटना घडल्याने नागरिकांत संतपाचे वातावरण आहे .घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते राम बनसोडे आणि शरद शिंदे यांनी अब्युलन्स मागावून संबधित वृद्ध नागरिकानां रुग्णालय मध्ये पाठविले. याबाबत पालिकेशी संपर्क साधला असता याबाबत प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही .

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख