...तर राठोडांनंतर 'मातोश्री'ला आणखी एक राजीनामा घ्यावा लागेल! - Narayan Rane Targets Uddhav Thackeray Over Sanjay Rathod issue | Politics Marathi News - Sarkarnama

...तर राठोडांनंतर 'मातोश्री'ला आणखी एक राजीनामा घ्यावा लागेल!

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 17 फेब्रुवारी 2021

केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पाची माहिती देण्यासाठी भाजप खासदार नारायण राणे मंगळवारी ठाण्यात आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर ताशेरे ओढले. केंद्र सरकारने लाख हजार कोटी रुपये या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला दिले असल्याचा दावा राणे यांनी केला

ठाणे : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून संजय राठोड यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा मातोश्रीत बसलेले मुख्यमंत्री घेणार नाहीत. कारण तसे केले तर अशाच एका जुन्या प्रकरणावरून आणखी एका मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागेल, अशी खोचक टीका करत भाजप खासदार नारायण राणे यांनी अभिनेता सुशांतसिह राजपूत प्रकरणावरून ठाकरे सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला. हे सरकार महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना पाठबळ देत असून कुंपणच शेत खात आहे, अशी राज्याची अवस्था झाल्याचे ते म्हणाले.

केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पाची माहिती देण्यासाठी भाजप खासदार नारायण राणे मंगळवारी ठाण्यात आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर ताशेरे ओढले. केंद्र सरकारने लाख हजार कोटी रुपये या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला दिले असल्याचा दावा राणे यांनी केला. केवळ टीका करावयाची व प्रत्येक वेळी केंद्राकडे पैशासाठी हात पसरायचे, हेवागणे बरे नसल्याचा पुनरुल्लेख राणे यांनी केला. आंतरराष्ट्रीय बाजारातपेट्रोल, डिझेलचेभाव वाढल्याने देशात दरवाढत आहे. पणराज्य सरकार कर कमी करून सामान्य जनतेला दिलासा देऊ शकते. असे बोलून नारायण राणे यांनी इंधन दरवाढीचा चेंडूठाकरे सरकारच्या कोर्टात सरकवला.

ठाणे महापालिकेत भाजपाचीस्वबळावरसत्ता येणार
ठाणे महापालिकेत अधिकार्यानाहाताशी धरून शिवसेनेचा भ्रष्टाचार सुरु आहे. त्यामुळे भाजप केवळ स्वबळावरपालिका निवडणूक लढणारनाही तरसत्ताही आणणार असल्याचा विश्वास खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केला.

जनताच या सरकारला पळवणार
राज्याची तिजोरी रिकामी आहे. ती भरण्यासाठी यासरकारकडे कोणतेच नियोजन नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा सातबाराअजून कोरा झाला नाही. यांच्यात ताळमेळ नसल्याने हे सरकार पडणारच यावर आपण ठाम आहोत. पण त्याचा मुहूर्त आम्ही सांगणार नाही, असे राणे म्हणाले. जनताच या सरकालरला पळवणार,असेही तेम्हणाले.
Edited By - Amit Golwalkar
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख