खासदार, दुसऱ्यांची कामेही आपल्याच नावावर खपवतात : श्रीकांत शिंदेंना राजू पाटलांचा टोला

कामांचे केवळ बॅनर लागतात, प्रत्यक्षात कामे आहेत कुठे?
MNS MLA Raju Patil's Criticism to MP Dr. Shrikant Shinde
MNS MLA Raju Patil's Criticism to MP Dr. Shrikant Shinde

डोंबिवली : कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळून निधी देण्याची तयारी एमएमआरडीएने दाखवली आहे. शिवसेनेच्या प्रयत्नाने ही कामे मंजूर झाली असून सेनेचे बॅनर सध्या शहरात झळकत आहेत. निधी मिळताच शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी भारतीय जनता पक्षाच्या आमदारांवर निशाणा साधत विरोधक वैफल्यग्रस्त झाल्याची टीका केली होती. त्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनी कामांचे केवळ बॅनर लागतात, प्रत्यक्षात कामे आहेत कुठे, असा सवाल करत खासदार डॉ. शिंदे यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांच्या निधीवरून राजकीय जुगलबंदी सुरु  झाल्याचे दिसत आहे. (MNS MLA Raju Patil's Criticism to MP Dr. Shrikant Shinde)

कल्याण डोंबिवलीतील मुख्य रस्त्यांच्या कामासाठी 360 कोटी रुपयांचा निधी, एमआयडीसीतील रस्त्यांच्या कामासाठी 110 कोटी निधी एमएमआरडीने मंजूर केला आहे. शिवसेनेच्या कार्यकाळात हा निधी मंजूर झाला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानणारे खासदार डॉ. शिंदे यांचे बॅनर सध्या शहरात झळकत आहेत. 

रस्त्यांच्या कामासाठी 360 कोटींचा निधी मंजूर होताच खासदार शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकात भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांच्यावर निशाणा साधला होता. केवळ कागदी घोडे नाचवून निधी मंजूर झाल्याचे चित्र निर्माण करायचे, यात तत्कालीन सत्ताधारी आणि सध्या विरोधी पक्षाचे असलेले आमदार रमले असल्याची टीका खासदार शिंदे यांनी केली होती. 

या वादावर आमदार चव्हाण यांनी आतापर्यंत तरी चुप्पी साधली आहे. मात्र, त्यात मनसेचे आमदार राजू पाटील यांनी उडी घेत या होर्डिंगबाजीवरून खासदार शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. एमएमआरडीएने मंजूर केलेले रस्ते कोणत्या वर्षांतील आहेत? नुसत्या मंजुऱ्या येतात, होर्डिंग लागतात. मात्र, प्रत्यक्षात कामे कधी सुरू होणार, असा सवाल उपस्थित करत आम्ही मंजूर केलेले रस्तेही आपल्या नावावर खपवतात, असा टोला त्यांनी खासदार शिंदे यांना लगावला आहे. एमआयडीसीतील रस्त्यांच्या कामासाठी 110 कोटीही मंजूर झाले. पण, कामे सुरू झाली का? मानपाडा रस्त्याचे काम अशोक चव्हाण यांच्याकडून मंजूर करून आणले, त्याचे स्पष्ट पत्रही माझ्याकडे आहे. मात्र श्रेयाच्या लढाईत मला पडायचे नाही, ते त्यांनीच करावे, असेही ते म्हणाले. 

रस्त्यांच्या कामासाठी एमएमआरडीएने निधी मंजूर केला आहे. अद्याप या कामाला सुरुवात झालेली नाही. मात्र, या कामाच्या श्रेयवादावरून कल्याण डोंबिवलीत मात्र राजकीय जुगलबंदी चांगलीच रंगली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com