कोरोनाग्रस्ताच्या घरावर मिरा-भाईंदर पालिकेने केली बॅनरबाजी

मिरा रोड शांतीपार्क परिसरातील इमारतीतील कोरोनाग्रस्त रहिवाशाच्या घराच्या दारावर मिरा-भाईंदर महापालिकेने भलेमोठे फ्लेक्‍स, बॅनर लावले आहेत. हा रुग्ण नुकताच बरा होऊन परतला आहे. पालिकेने त्याला चौदा दिवस होम क्वारंटाईन केले आहे.
Mira Bhayander Corporation Placed Banners on Corona Patients Home
Mira Bhayander Corporation Placed Banners on Corona Patients Home

मिरा रोड : मिरा रोड शांतीपार्क परिसरातील इमारतीतील कोरोनाग्रस्त रहिवाशाच्या घराच्या दारावर मिरा-भाईंदर महापालिकेने भलेमोठे फ्लेक्‍स, बॅनर लावले आहेत. हा रुग्ण नुकताच बरा होऊन परतला आहे. पालिकेने त्याला चौदा दिवस होम क्वारंटाईन केले आहे. 

वास्तविक पाहता तो रुग्ण रहात असलेला मजला कटेंन्मेंट झोन जाहीर केल्यानंतर केवळ त्याच्या घरावरच होम क्वारंटाईनचे स्टिकर लावणे अपेक्षित होते. मात्र, त्याच्या घरावर पालिकेने चक्क बॅनर आणि फ्लेक्स लावले. त्याचे फोटो काही अतीउत्साही मंडळींनी सोशल मिडियावर व्हायरल केल्यानंतर खळबळ उडाली. दरम्यान, कोरोनाग्रस्ताची गोपनीय माहिती गोपनीय ठेवणे आवश्यक आहे. परंतू, ही माहिती बेकायदेशीरपणे उघड केल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी  मनसेचे शहराध्यक्ष हेमंत सावंत आणि सचिव शान पवार यांनी पोलिस उपअधीक्षक शांताराम वळवी यांच्याकडे केली आहे.

मिरा रोड येथील या व्यक्तीला मुंबईतील कामाच्या ठिकाणी कोरोनाची लागण झाली. त्यामुळे त्याला एक जूनला भाईंदरच्या  कोव्हिड १९ रुग्णालयात दाखल करण्यात आले. संबंधित व्यक्तीच्या पत्नीसह तीन मुलांना कोरोनाची कोणतीही लक्षणे न आढळल्याने पालिकेने त्यांना घरातच क्वारंटाईन केले. या कोरोनाग्रस्तावर उपचार सुरू इमारतीतीलच एका व्यक्तीच्या तक्रारीवरून पालिकेने या कोरोनाग्रस्ताच्या कुटुंबाला चार दिवसांपूर्वी क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल केले. 

नंतर कोरोनाग्रस्ताची प्रकृती बरी झाल्याने पालिकेने त्याला ११ जूनला घरी जाण्याची परवानगी दिली. त्याने कुटुंबाबाबत विचारणा केली असता त्या सर्वांना क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल केल्याची माहिती त्याला देण्यात आली. आपणाला घरी सोडल्यानंतरही पालिकेने आपल्या घरावर स्टीकरऐवजी मोठे फ्लेक्स लावले व आपल्याला २३ जूनपर्यंत क्वारंटाईन केल्याचे त्यावर नमूद केले असा आरोप संबंधित व्यक्तीने केला आहे. याबाबत पालिका आयुक्त चंद्रकांत डांगे यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. 

खच्चीकरण केल्याचा आरोप

कोरोनाच्या या संकटात अनेक ठिकाणी गृहनिर्माण संस्था पदाधिकारी, सदस्य सरकारच्या नियमावलीला डावलून नियम लादत असल्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत. आपल्या घरावर बॅनर्स लावून पालिकेने आपल्या कुटुंबाचे खच्चीकरण केले आहे व गोपनियतेचा भंग केला आहे. त्यामुळे पोलिसांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पीडित व्यक्तीने केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com