एकनाथ शिंदे यांचा सामना आता कपिल पाटलांशी

कपिल पाटील यांच्या रुपाने ठाणे जिल्ह्याला पहिल्यांदा केंद्रीय मंत्रीपदाची संधी मिळाली आहे.
  Eknath Shinde, Kapil Patil .jpg
Eknath Shinde, Kapil Patil .jpg

ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील पहिला मंत्रिमंडळ विस्तार बुधवारी (ता. ७ जुलै) सायंकाळी पार पडला. या विस्तारात राज्यातून नारायण राणे, (Narayan Rane) भागवत कराड, कपिल पाटील, (Kapil Patil) भारती पवार यांची मंत्रीपदी वर्णी लागली आहे. राणे यांना कॅबिनेट मंत्रीपदी, तर इतर तिघांना राज्यमंत्रीपदाची संधी देण्यात आली आहे. (Appointment of Kapil Patil as Union Minister of State)

त्यामध्ये भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांच्याकडे पंचायत राज्यमंत्री ह्या विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. कपिल पाटील यांच्या रुपाने ठाणे जिल्ह्याला पहिल्यांदा केंद्रीय मंत्रीपदाची संधी मिळाली आहे. कपिल पाटील यांना मंत्रीपद देण्यामागे भाजपचे वेगळे धोरण आहे. आगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांना संधी मिळाल्याची चर्चा आहे. ठाणे महानगरपालिका आणि जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची एकहाती सत्ता आहे. त्या सत्तेला शह देण्यासाठी भाजपने कपिल पाटील यांना बळ दिल्याचे बोलले जात आहे.  

मुंबई, भिवंडी-कल्याण आणि ठाणे महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेला नामोहर करण्याकरता राणे व पाटील यांना बळ दिले आहे. तसेच नवी मुंबईतील विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी आगरी समाजाच्या वतीने होत आहे. कपिल पाटील हे आगरी समाजाचे आहेत. त्यांनी सर्वप्रथम लोकसभेत दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला द्यावे, अशी मागणी केली होती. तर एकनाथ शिंदे यांनी विमानतळाला  बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे शिवसेनेविरोधात आगरी समाजाला ताकद देण्याचीही रननीती आहे. त्यामुळे पाटील यांना संधी देउन आगरी समाजाच्या मतांचे ध्रुवीकरण करण्याचाही भाजपचा हेतू आहे.  

राज्यात विधानसभेच्या निवडणुकीनंतर शिवसेना भाजपमध्ये झालेल्या फारकतीमुळे ठाणे जिल्ह्यात शिवसेनेच्या वर्चस्वाला धका देण्यासाठी पाटील यांना ताकद देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे आता शिंदे आणि पाटील यांच्यात राजकीय सामना ठाणे महापालिका निवडणुकीत रंगणार आहे. पाटील यांना शिंदे यांच्या राजकीय शक्तीचा सामना करावा लागणार आहे. ठाण्यामध्ये सध्या शिवसेनेचे व एकनाथ शिंदे यांचे वर्चस्व आहे. पाटील यांनी शिंदे पिता-पुत्रांवर अनेक वेळा टीका केली आहे. 

मुंबईतील शिवसेनेच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी नारायण राणे यांना तर ठाणे जिल्ह्यात शिवसेनेला शह देण्यासाठी कपिल पाटील यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संधी देण्याचे धोरण आवलंबले असल्याचे बोलले जात आहे. या दोघांच्या मंत्रीमंडळातील समावेशामुळे आता शिवसेना-भाजप युती होण्याची शक्यताही मावळली आहे.                

Edited By - Amol Jaybhaye 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com