कल्याणच्या लोकप्रतिनिधीच्या मुलीच्या विवाह सोहोळ्यात 'कुठले कोरोनाचे नियम?'.. - Kalyan Elected Representative Flouting Corona Rules in Wedding | Politics Marathi News - Sarkarnama

कल्याणच्या लोकप्रतिनिधीच्या मुलीच्या विवाह सोहोळ्यात 'कुठले कोरोनाचे नियम?'..

प्रदीप भणगे
रविवार, 4 एप्रिल 2021

कोरोना वाढत असला तरीही एकीकडे असले तरी कल्याण  मध्ये मात्र आज ही बिनदिक्कत राजकीय पदाधिकाऱ्यांचे सोहळे आयोजित होताना दिसत आहेत  सोशल डिस्टन्सिंग सोडा मात्र साधा मास्क घालण्याची तसदी देखील  बहुतेक नागरिकांनी घेतलेली  दिसून आलेली नाही .

कल्याण :  कल्याण (Kalyan Dombivai) पश्चिमेकडिल काळा तलाव नजीक असलेल्या मॅरेज लॉन मध्ये काल शिवसेना (Shivsena) नगरसेविका शालिनी वायले आणि माजी नगरसेवक सुनील वायले यांच्या मुलीचा लग्न सोहळा आयोजित करण्यात आला होता. या लग्नसोहळ्याला  हजारो नागरिकांची गर्दी दिसून आली आहे. Kalyan Elected Representative Flouting Corona Rules in Wedding

कोरोना वाढत असला तरीही एकीकडे असले तरी कल्याण  मध्ये मात्र आज ही बिनदिक्कत राजकीय पदाधिकाऱ्यांचे सोहळे आयोजित होताना दिसत आहेत.  सोशल डिस्टन्सिंग (Socail Distancing) सोडा मात्र साधा मास्क (Face Mask) घालण्याची तसदी देखील  बहुतेक नागरिकांनी घेतलेली  दिसून आलेली नाही .शहरात कोरोनाचे रुग्ण संख्या मध्ये पुन्हा एकदा वाढ होत असताना लोकप्रतिनिधींना मात्र सामाजिक भान नसल्याचे दिसून येते आहे. 

राज्यात कोरोनाच्या (Corona) वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुन्ह एकदा लोकडाऊनच्या (Lock Down) दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गर्दी न करण्याचे, मास्क वापरण्याचे आणि सोशल डिस्टनसींगचे पालन करण्याचे आवाहन करत आहेत.राज्यात रात्री आठ नंतर जमावबंदी चे आदेश लागू करण्यात आले आहेत. Kalyan Elected Representative Flouting Corona Rules in Wedding

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात गेल्या महिनाभरात तेरा हजारहून अधिक रुग्णांची नोंद झालीय. गेल्या दोन दिवसांपासून कल्याण डोंबिवली मध्ये दरदिवस हजाराहूनअधिक रुग्णांची नोंद होते आहे. कालही कल्याण मुंबई मध्ये 1244 रुग्णांची नोंद झाली. या  पार्श्वभूमीवर महापालिकेने निर्बंध घातले आहेत. 

विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या आव्हालाना शिवसेनाच्या पदाधिकारी यांनी फाटा फोडला आहे.तर लग्नाचा व्हीडिओ आता व्हायरल झाला आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घातलेले निर्बंध हे फक्त सर्वसामान्यासाठीच आहेत का असा सवाल आता उपस्थित झाला आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख