आव्हाडांनी केली मोदींची हिटलरशी तुलना

अहमदाबादमधील सर्वात मोठ्या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव देण्यात आलं आहे. यावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे गृहनिर्माण मत्री जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे
Naredra Modi - Adolf Hitler - Jitendra Awhad
Naredra Modi - Adolf Hitler - Jitendra Awhad

ठाणे : अहमदाबादमधील सर्वात मोठ्या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव देण्यात आलं आहे. यावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे गृहनिर्माण मत्री जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना त्यांची तुलना हिटलरशी केली आहे. 

अहमदाबाद  येथील मोटेरा क्रिकेटचे नूतनीकरण करण्यात आले असून, त्याला आता जगातील सर्वांत मोठे क्रिकेट स्टेडियम बनवण्यात आल आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या स्टेडियमचे उद्घाटन झाले. या स्टेडियमचे नाव आधी सरदार पटेल स्टेडियम होते. आता त्याते नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडियम करण्यात आले आहे. मोदींचे नाव स्टेडियमला देण्यावरुन नेटिझन्सनी सोशल मीडियावरून भाजपवर हल्लाबोल केला आहे. हिटलर सत्तेत आल्यानंतर त्याने देखील मोठे स्टेडियम बनवून त्याला स्वत:चं नाव दिलं होतं, असा टोला आव्हाडांनी मोदींना लगावला आहे.  

 राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते बुधवारी नरेंद्र मोदी स्टेडियमचं उद्घाटन करण्यात आलं आहे. नामांतरावरुन जितेंद्र आव्हाड यांनी टीकास्त्र सोडलं आहे. स्वातंत्र्य चळवळीतील महान नेते व गुजरातचे सुपुत्र सरदार पटेल यांच्या नावाने मते मागून थकल्यावर त्यांच्या नावे असलेले गुजरात मधील स्टेडियम स्वतःच्या नावावर करून घेतलेहिटलर सत्तेत आल्यानंतर त्याने देखील मोठे स्टेडियम बनवून त्याला स्वतःचे नाव दिले होते, असं ट्वीट करत मोदींवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, नावे बदलण्याच्या धुंदीत भारतरत्न मिळालेल्या महापुरुषांचा अवमान भाजपकडून करण्यात येतोय, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्टेडियमचे नाव बदलून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात आले आहे. यावर नवाब मलिक यांनी भाजपावर जोरदार प्रहार केला आहे.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com