नदी प्रदुषणाला वैतागलेल्या नागरिकांचे आदित्य ठाकरेंवर तिरकस बाण! - Citizens wrote to Aditya Thackeray About Ulhas River Pollution | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांच्यासह सहा जणांवर म्हसवड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे

नदी प्रदुषणाला वैतागलेल्या नागरिकांचे आदित्य ठाकरेंवर तिरकस बाण!

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 15 फेब्रुवारी 2021

उल्हास नदी बचाव समितीने मागील चार दिवसांपासून सातत्याने सरकारी यंत्रणातील अधिकारी तसेच राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना पोस्ट कार्डद्वारे जल प्रदूषण दूर करण्यासाठी हाक दिली आहे. 'मी कल्याणकर' या सामाजिक संस्थेतर्फे १० फेब्रुवारीपासून नदीपात्रात आंदोलनही सुरू झाले आहे.

कल्याण  : उल्हास नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी 'उल्हास नदी बचाव समिती'मार्फत सुरू करण्यात आलेल्या पोस्टकार्ड आंदोलनामार्फत राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना तिरकस संदेश देण्यास सुरुवात झाली आहे. या प्रश्नाकडे आपण लक्ष देऊच नका, जिल्ह्यातील सर्वात मोठी नदी आता मोठ्या नाल्यात रूपांतरित होत आहे, यात आपलाही सहभाग असेल, असे संदेश पोस्ट कार्डाद्वारे पाठवण्यास सुरुवात झाली आहे.

उल्हास नदी बचाव समितीने मागील चार दिवसांपासून सातत्याने सरकारी यंत्रणातील अधिकारी तसेच राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना पोस्ट कार्डद्वारे जल प्रदूषण दूर करण्यासाठी हाक दिली आहे. 'मी कल्याणकर' या सामाजिक संस्थेतर्फे १० फेब्रुवारीपासून नदीपात्रात आंदोलनही सुरू झाले आहे. नदी प्रदूषित करणाऱ्या उद्योगांवर कारवाई न करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी टजागरुक नागरिक मंचा'तर्फे पोलिसांना पत्र देण्यात आले आहे. परंतु त्यानंतरही या विषयाची कोणत्याही सरकारी यंत्रणेने गांभीर्याने दखल घेतलेली नाही. यामुळेच आता पर्यावरण मंत्र्यांना तिरक्‍या भाषेत पत्र लिहिण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

मोहने परिसरातील दोन नाल्यांमधून नदीपात्रात दररोज अंदाजे सहा ते आठ दशलक्ष लिटर ड्रेनेजचे पाणी सोडण्यात येते, असे आंदोलनकर्ते कैलास शिंदे यांनी सांगितले आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाणी प्रदूषित होते. या पाण्यावर जलपर्णीची वाढ झपाट्याने होते. या जलपर्णीमुळे पाण्यातील जीवसृष्टीला धोका निर्माण झाला आहे. मोठ्या प्रमाणावर मासेही मरत असल्याचे निदर्शनास येत असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

....काय लिहिलेय पत्रात
वाढत्या प्रदूषणामुळे नजीकच्या भविष्यकाळात जिल्ह्यातील सर्वात मोठी नदी सर्वात मोठ्या नाल्यात रूपांतरित होणार आहे. यात आपलेही योगदान असेल. नदी स्वच्छ झाल्यास येणाऱ्या पिढ्यांना त्याचा लाभ होईल, मात्र पर्यावरणवाद्यांना हे मान्य नाही, असेही पत्रात लिहिण्यात आले आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख