भाजप-ओवेसींची मिलीभगत; राष्ट्रवादीच्या युवक कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप

भाजपची सुपारी घेऊन ओवेसी जातीय दंगली भडकावत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी केला.
Asaduddin Owaisi
Asaduddin Owaisi

ठाणे  : एमआयएमचे अध्यक्ष ओवेसी नेहमीच आक्रमक आणि हिंसा भडकवणारी भाषणे करीत आहेत; मात्र त्यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात येत नाहीत. भाजपच्या बालेकिल्ल्यांमध्ये एमआयएमचे लोक हिंसक भाषणे करीत आहेत. त्यानंतर दंगली भडकावल्या जात आहेत. म्हणजेच भाजपची सुपारी घेऊन ओवेसी जातीय दंगली भडकावत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी केला.

ठाणे शहरातील एनकेटी सभागृहामध्ये राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचा संकल्प मेळावा पार पडला. या मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. या वेळी शेख म्हणाले, की देशात भाजपने हिंदू-मुस्लीम धर्मीयांमध्ये फूट पाडण्याचे काम सुरू केले आहे. त्यासाठी त्यांनी एमआयएमच्या ओवेसी यांचा वापर सुरू केला आहे. ओवेसी स्वत: आणि माजी आमदार वारीस पठाण हे भाजपचे प्राबल्य असलेल्या भागात जाऊन द्वेष पसरवणारी भाषणे करत आहेत; मात्र हार्दिक पटेल, कन्हय्या कुमार यांच्यावर देशद्रोहाचे खटले दाखल करणारे केंद्रातील सरकार ओवेसी-पठाण यांच्यावर गुन्हे दाखल करीत नाही. यावरून भाजप आणि एमआयएम यांची मिलीभगत असल्याचे स्पष्ट होत आहे, असा आरोप मेहबूब शेख यांनी केला.

देशात सध्या फक्त शरद पवार हेच भाजपला टक्कर देणारे एकमेव नेते आहेत. त्यामुळे आता युवक म्हणून आपली जबाबदारी वाढली आहे. आगामी तीन महिन्यांत युवकांनी काम करून बुथबांधणी करावी व 2024 मध्ये केंद्रातील भाजप सरकारला धडा शिकवावा, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले. या वेळी युवक शहराध्यक्ष विक्रम खामकर, राष्ट्रवादीचे युवक रोजगार सेलचे ओमकार माळी, नगरसेवक जितेंद्र पाटील, महिला कार्याध्यक्षा सुरेखा पाटील, परिवहन सदस्य मोहसीन शेख आदी उपस्थित होते.

आंदोलनातूनच युवक घडतो : डॉ. आव्हाड
आंदोलनांमधूनच युवक घडत असतो. आपणाला केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात जनजागृती करण्यासाठी आंदोलने करावी लागणार आहेत. जनतेच्या हिताचे प्रश्‍न घेऊन आपण लढले पाहिजे, असे आवाहन या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तथा गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केले.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com