पोलिसांची कुणकुण लागल्यानंतर भाजपचे नेते पळून गेले...

अभिषेक दुबे या पत्रकाराला झारखंडमध्ये अटक केल्यानंतर त्याच्या पोलीस चौकशीतून हा धक्कादायक खुलासा समोर आल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.
Chandrashekhar-Nawab Malik
Chandrashekhar-Nawab Malik

मुंबई : झारखंडमध्ये हेमंत सोरेन (Hemant Soren) यांचे सरकार पाडण्यासाठी पैसे देऊन आमदार फोडण्याचे कटकारस्थान भाजपकडून झारखंडमध्ये रचले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी पत्रकार परिषदेत केला. अभिषेक दुबे या पत्रकाराला झारखंडमध्ये अटक केल्यानंतर त्याच्या पोलीस चौकशीतून हा धक्कादायक खुलासा समोर आल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. (BJP tried to topple Jharkahnd Govt alleges NCP)

 हा पत्रकार तीन आमदारांशी संपर्कात होता. या आमदारांशी डील करण्यासाठी महाराष्ट्रातील भाजपचा एक माजी मंत्री देखील गेला असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला. तसेच २१ जुलै रोजी भाजपचे महाराष्ट्रातील पदाधिकारी मोहीत कंबोज, अमित यादव, आशुतोष ठक्कर हे लोक पैसे घेऊन झारखंड येथे दाखल झाले. मात्र पोलिसांची कुणकुण लागल्यानंतर या लोकांनी तिथून पळ काढला असेही नवाब मलिक म्हणाले. 

आमदार फोडाफोडीच्या या कार्यक्रमाची चौकशी करण्यासाठी झारखंड सरकारने एसआयटीची तीन पथके स्थापन केली असून यापैकी एक पथक झारखंडमध्ये, तर दुसरे दिल्लीत आणि तिसरे पथक महाराष्ट्रात तपासासाठी येणार आहे. महाराष्ट्रातील दोन आमदारांचा देखील त्यात समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. झारखंडची एसआयटी टीम महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांना पुर्ण सहकार्य केले जाईल असेही नवाब मलिक यांनी जाहीर केले. 

राज्यात पूरपरिस्थितीमुळे लोक दुःखात असताना भाजपचे लोक झारखंडचे आमदार फोडण्यासाठी पैसे घेऊन जात आहेत. एका - एका आमदारासाठी कोट्यवधी रुपयांचे आमिष दाखविण्यात आले. पूरपरिस्थितीत हेच पैसे लोकांच्या मदतीसाठी देता आले असते, मात्र झारखंडचे सरकार पाडण्यासाठी भाजपची यंत्रणा काम करत आहे असा आरोपही नवाब मलिक यांनी केला. कर्नाटक सरकार पाडत असताना मुंबई कनेक्शन दिसून आले होते. आता झारखंड सरकार पाडतानाही महाराष्ट्र कनेक्शन समोर आले आहे. लोकशाहीला डावलून सरकार स्थापन करण्याचे भाजपचे कारस्थान आता समोर आले असून झारखंड पोलीस नक्कीच याचा तपास करतील अशी शक्यता नवाब मलिक यांनी व्यक्त केली.

यावेळी नवाब मलिक यांनी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे नाव पत्रकार अभिषेक दुबे यांनी पोलीस चौकशीत उघड केले आहे. यामुळे पैशांचा घोडेबाजार करुन झारखंड सरकार बदलण्याचा डाव उघड झाला आहे. महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस होणार नाही. भाजपला ते शक्य नाही असेही नवाब मलिक यांनी भाजपला ठणकावून सांगितले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com