आपल्या वाढदिवशी त्यांनी मागितली 'ही' भेटवस्तू....

हजारो रुपयांचे पेट्रोल, डिझेल भरून मला शुभेच्छा देण्यासाठी येत असता. यावर्षी जरी आपली भेट होणार नसली तरी यावेळी मला तुमच्याकडून एक भेटवस्तू हवी आहे.
4bala_nandgaonkar_1
4bala_nandgaonkar_1

पुणे : 21 जून, हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांचा जन्मदिन. यानिमित्ताने त्यांनी आपल्या हितचिंतक, मित्रांकडून एक भेट वस्तू मागितली आहे. याबाबतची नांदगावकर यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे.  शक्य असल्यास गरजू मुलांना   "स्कुल बॅग" दया, असे त्यांनी सांगितले आहे. 

'एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ'या पोस्ट बाळा नांदगावकर म्हणतात, " या वर्षी माझ्या जन्मदिनी 21 जून रोजी आपली भेट होणार नाही, वर्षानुवर्षे तुम्हा सगळ्यांबरोबर असलेल्या ऋणानुबंधामुळे तसेच आपल्या सगळ्यांचे माझ्यावर असलेल्या प्रेमापोटी राज्याच्या कानाकोपऱ्यातून या दिवशी मला शुभेच्छा द्यायला आपण प्रत्यक्ष येता . या दिवशी मला आपण सर्व प्रेमाने अनेक प्रकारच्या भेटवस्तू ही देता किंबहुना हजारो रुपयांचे पेट्रोल, डिझेल भरून मला शुभेच्छा देण्यासाठी येत असता. यावर्षी जरी आपली भेट होणार नसली तरी यावेळी मला तुमच्याकडून एक भेटवस्तू हवी आहे.

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपले अनेक बांधव आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले आहेत, अशा बांधवांना आपण जिथे असाल तिथे एक मदत करावी अशी माझी इच्छा आहे. आपणास शक्य असल्यास गरजू मुलांना "स्कुल बॅग" दयावी. हे करतांना जसे मी बोललो की शक्य असल्यास, त्यामुळे सर्वप्रथम तुम्ही आपल्या कुटुंबाची काळजी घेऊन मगच समाजकार्य करावे. "


ही स्कूल बॅग कोणाला द्यावी ते त्यांनी स्पष्ट केले आहे. ते म्हणतात, "स्कुल बॅग शक्यतो जे सरकारी शाळेत शिकत आहे व ज्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे अशांना दयावी. तसेच हे करतांना सोशल डिस्टनसिंग कटाक्षाने पाळावे. हे करण्यामागचा हेतू हा आपल्या बांधवांचे ओझे कमी करण्याचा आहे त्यांचे मानसिक ओझे वाढविण्याचा नव्हे, त्यामुळे स्कुल बॅग वर कसल्याही प्रकारचे स्टिकर, फोटो लावून त्यांना कमीपणा वाटेल असे कोणतेही कृत्य करू नये.

स्कुल बॅग बरोबर तुम्ही फोटो काढून ते मला पुढील पोस्ट ला कमेंट मधे पाठवू शकता परंतु स्कुल बॅग ज्यांना देत आहोत त्यांना देतांना अथवा त्यांच्या बरोबर अजिबात फोटो काढू नये. हे करतांना ज्यांना शक्य आहे त्यांनी यथाशक्ती जास्तीत जास्त स्कुल बॅग देण्याचा प्रयत्न करावा, व अडचणीत असलेल्या आपल्या बांधवांच्या पाठीशी आपण सर्वजण ठामपणे उभे असल्याचा संदेश दयावा ही आपणा सर्वांना विनंती.

लॉकडाउन च्या वेळी जवळपास 80- 90 दिवस राज्यभर आपल्या महाराष्ट्र सैनिकांनी आदर्श अशी जनसेवा करून अतिशय उत्कृष्ट उदाहरण समाजासमोर ठेवले त्याबद्दल पक्षप्रमुख राजसाहेब, शर्मिला वहिनी, अमित यांनी आपले मनापासून अभिनंदन केलेलेच आहे. साहेबांनी 14 जून रोजी त्यांच्या वाढदिवसाच्या दिनी दिलेला संदेश हा आपल्याला आदेश म्हणूनच काटेकोरपणे पाळावाच लागेल.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com