एकनाथ शिंदेच्या आदेशाने आशा वर्कर्स सुखावल्या

या आधी एक हजार रुपये अर्था ३३ रुपये ३ पैसे असा आशा वर्कर्सचा रोजंदारीचा दर होता. एकनाथ शिंदेंच्या आदेशाने तो दहा हजार रुपये करण्यात आला आहे
Eknath Shinde Raised Honorarium of Asha Workers
Eknath Shinde Raised Honorarium of Asha Workers

उल्हासनगर  : ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशान्वये उल्हासनगरात कोविड रुग्णांच्या सर्व्हेक्षणाचे काम करणाऱ्या आशा वर्कर्सचे मानधन एक हजारांवरुन १० हजार रुपये करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे ११० आशा वर्कर्सना मोठा दिलासा मिळाला आहे.

या आधी एक हजार रुपये अर्था ३३ रुपये ३ पैसे असा आशा वर्कर्सचा रोजंदारीचा दर होता. अशोका फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष शिवाजी रगडे, टीओकेच्या नगरसेविका सविता तोरणे-रगडे यांनी याबाबत महापौर लिलाबाई आशान, आयुक्त समीर उन्हाळे, सभागृहनेते राजेंद्र चौधरी, ओमी कालानी यांच्याकडे हा प्रश्न नेला होता. गेल्या शुक्रवारी (ता. १२) ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे,  एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे उल्हासनगर महानगरपालिकेत कोविडच्या आढावा बैठकीसाठी आले होते.

त्यावेळी महापौर लिलाबाई आशान यांनी कोविड रुग्णांच्या सर्व्हेक्षणचे काम करणाऱ्या आशा वर्कर्सच्या तोकड्या मानधनाची व्यथा शिंदे यांच्याकडे मांडली. हे निवेदन वाचताच शिंदे यांनी आशावर्कर्सच्या मानधनात तात्काळ वाढ करावी, असा आदेश आयुक्त समीर उन्हाळे यांना दिला.

आशा वर्कर्सचे मानधन महिन्याला नऊ हजार रुपये वाढवण्यात आल्याचे आज आज मुख्यालय उपायुक्त मदन सोंडे यांनी जाहीर केले. आता आशा वर्कर्सना १० हजार रुपये मानधन मिळणार आहे. हा निर्णय ऐकल्यावर पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, महापौर लिलाबाई आशान, आयुक्त समीर उन्हाळे, सभागृहनेते राजेंद्र चौधरी, ओमी कालानी व शिवाजी रगडे यांचे आभार आशा वर्कर्स संजीवनी कोंतम आणि उज्वला खरात यांनी मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com