जयंत पाटलांच्या मुलाचे बाळासाहेब थोरातांनी यासाठी केले कौतुक !  

या कठीण काळात आपल्या राज्याला पाठिंबा देण्यासाठी आमच्या सोबत सामील व्हा.
Revenue Minister Balasaheb Thorat praises Jayant Patil's son
Revenue Minister Balasaheb Thorat praises Jayant Patil's son

मुंबई : कोरोनाविरोधात लढण्यासाठी राज्य सरकारने १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना मोफत लस देण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षीपासून राज्यात एकीकडे पुन्हा पुन्हा लॉकडाउन करावा लागत आहे, तर दुसरीकडे खर्च वाढत आहे. त्यामुळे राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे. अशा आर्थिक संकटाच्या काळात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे सुपुत्र प्रीतक पाटील यांनी एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कौतुक करत तो इतरांनीही अंमलात आणण्याचे आवाहन केले आहे.

राज्य सरकारने मोफत कोरोना लसीकरणाचा निर्णय घेतला आहे. मी व माझ्या मित्रांनी ठरवले आहे, जरी मोफत लस मिळत असली तरी आम्ही स्वतःच्या व अजून ५ जणांच्या लशीची किंमत मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करू. या कठीण काळात आपल्या राज्याला पाठिंबा देण्यासाठी आमच्या सोबत सामील व्हा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे चिरंजीव प्रतीक पाटील यांनी केले. त्यांनी आपल्या या उपक्रमाची माहिती फेसबुकवर एक व्हिडिओ पोस्ट करून दिली आहे. त्यांच्या या उपक्रमाचे राज्यभरातून कौतुक होत आहे.  

या उपक्रमाबाबत प्रतीक पाटील यांनी म्हटले आहे की, आपला देश आणि राज्य एका कठीण परिस्थितीतून जात आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत या विषाणूचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला आहे. या कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्याचा आणि त्यावर मात करण्याचा एकच उपाय राहिला आहे, तो म्हणजे लसीकरण.

येत्या एक मेपासून १८ वर्षे वयोगटाच्या पुढील सर्व नागरिकांना ही लस मोफत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मी आणि माझ्या काही मित्रांनी असे ठरवले आहे की, जरी सरकार ही लस मोफत देणार असले तरी माझे स्वतःचे आणि इतर पाच जणांच्या लसीचे पैसे मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करण्याचा उपक्रम आम्ही सुरू केला आहे. लसीकरणाच्या मोहिमेमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे मी आवाहन करतो, असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
 
काय म्हणाले बाळासाहेब थोरात?

काही तरुण मंडळीही या विधायक कार्यात पुढाकार घेत आहेत. मंत्रिमंडळातील माझे सहकारी, राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे सुपुत्र प्रतीक यांनी स्वतः आणि इतर पाच व्यक्तींच्या लसीकरणाचा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचे जाहीर केले आहे, त्यांच्या या भूमिकेचे मी कौतुक करतो, अशा शब्दांत राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रतीक पाटील यांच्या या उपक्रमाचे स्वागत केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com