साहब...'इन्सानियत' जिंदा रहनी चाहिए...!

धुळे शहरातील पेठ भागातील गल्ली क्रमांक सातमधील वृद्ध महिलेचा 'कोरोना'मुळे मृत्यू झाला. मरणोत्तर तपासणीनंतर तिचा अहवाल कोविड पॉझिटिव्ह आला. 'कोरोना' संसर्गाच्या भीतीमुळे या महिलेच्या अंत्यसंस्काराकडे नातेवाइकांसह मित्र परिवाराने पाठ फिरविली. संबंधित महिलेचा मुलगाही अशा प्रसंगाने हतबल झाला. शेवटी वर्षानुवर्षे गल्लीत राहणारे काही मुस्लिम तरुण कार्यकर्ते पुढे सरसावले
Muslim Youth Performed Last rites of Hindu Women Died of Corona in Dhule
Muslim Youth Performed Last rites of Hindu Women Died of Corona in Dhule

धुळे : ज्या गल्लीत आम्ही राहतो... त्याच गल्लीतील महिला आम्हाला मुलं, भाऊ मानतात. रक्षाबंधनाला आम्हाला राखी बांधतात. या 'इन्सानियत'च्या नात्यानेच आम्ही मंगळवारी मदतीसाठी उभे राहिलो. 'बिमारी तो आती- जाती रहेगी...इन्सानियत जिंदा रहनी चाहिए... हम तो तकदीरवाले है...' अशा भावना आहेत धुळे शहरातील 'त्या' मुस्लिम समाजातील  हिंमतवान  कार्यकर्त्यांच्या जे मंगळवारी हिंदू वृद्ध महिलेवर अंत्यसंस्कारांसाठी पुढे आले होते.

धुळे शहरातील पेठ भागातील गल्ली क्रमांक सातमधील वृद्ध महिलेचा 'कोरोना'मुळे मृत्यू झाला. मरणोत्तर तपासणीनंतर तिचा अहवाल कोविड पॉझिटिव्ह आला. 'कोरोना' संसर्गाच्या भीतीमुळे या महिलेच्या अंत्यसंस्काराकडे नातेवाइकांसह मित्र परिवाराने पाठ फिरविली. संबंधित महिलेचा मुलगाही अशा प्रसंगाने हतबल झाला. शेवटी वर्षानुवर्षे गल्लीत राहणारे काही मुस्लिम तरुण कार्यकर्ते पुढे सरसावले. त्यांनी मदतीचा हात पुढे केला अन्‌ सिव्हिल हॉस्पिटलमधून मृतदेह उचलण्यापासून ते अंत्यसंस्कारांपर्यंत त्यांनी एकहाती मदत केली.

त्यांनी घातले 'पीपीई किट'

संबंधित मृत महिलेच्या मुलासह फजलूर रहमान अन्सारी, निहाल अन्सारी, इम्रान अहमद अन्सारी यांनी 'पीपीई किट' परिधान करून महिलेचा मतदेह उचलला. चक्करबर्डी परिसरात महापालिकेने भाजपच्या नगरसेविका सारिका प्रवीण अग्रवाल, प्रवीण अग्रवाल, रानमळ्याचे सरपंच प्रवीण पवार यांच्या स्वमालकीच्या खासगी निश्‍चित केलेल्या मोकळ्या जागेवर संबंधित बाधित महिलेवर रात्री अंत्यसंस्कार केले. त्यासाठी रईस हिंदुस्थानी, नसीब अन्सारी, अब्रार अन्सारी, इक्‍बाल अन्सारी, सलमान अन्सारी, अॅम्ब्युलन्स चालक अबूभाई आदी कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला होता.

...त्यानंतरच नमाज अन्‌ सोडला रोजा

सध्या मुस्लिम बांधवांचा रमजानचा पवित्र महिना सुरू असल्याने 'रोजा' सोडण्याची प्रक्रिया सुरू असतानाच भावनिक घटना कानावर आली आणि मुस्लिम कार्यकर्ते थेट मदतीसाठी सरसावले. बाधित महिलेच्या अंत्यसंस्कारांची संपूर्ण प्रक्रिया पार पाडल्यानंतर थेट घरी न जाता एका ठिकाणी त्यांनी अंघोळ केली, सॅनिटायझेशनची खबरदारी घेतली आणि नंतरच ते घरी परतले. नमाज पठणानंतर त्यांनी रात्री रोजा सोडला. 'हम ने नेक काम किया...उपरवाले का शुक्रिया', अशी भावना रईस हिंदुस्थानी यांनी बोलून दाखविली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com