सानियाच्या सामाजिक जाणिवेचे जयंत पाटील यांच्याकडून कौतुक 

आटपाडी तालुक्‍यातील गोमेवाडी गावच्या सानिया संतोष देवकुळे या इयत्ता आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने पाटील यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तीन वर्षांपासून जमा केलेली खाऊची रक्कम दिली.
School girl gave her savings for CM Fund through Jayant Patil
School girl gave her savings for CM Fund through Jayant Patil

पुणे ः आटपाडी तालुक्‍याच्या दौऱ्यावर असलेले जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना रविवारी एक सुखद अनुभव आला. आटपाडी तालुक्‍यातील गोमेवाडी गावच्या सानिया संतोष देवकुळे या इयत्ता आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने पाटील यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तीन वर्षांपासून जमा केलेली खाऊची रक्कम दिली. पाटील यांनी सानियाच्या या सामाजिक जाणिवेचे कौतुक केले आहे. तिच्या पालकांनाही त्यांनी धन्यवाद दिले. 

मंत्री पाटील हे रविवारी आटपाडीच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यावर असताना वाटेत त्यांना रस्त्याच्या कडेला थांबलेल्या लोकांनी हात केला. त्यांनी गाडी थांबवल्यावर सानिया देवकुळे या विद्यार्थिनीने त्यांना "मी तीन वर्षे खाऊच्या पैशातून केलेली बचत मुख्यमंत्री निधीला कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी देत आहे,' असे सांगून ती रक्कम साठवलेला बॉक्‍स पाटील यांच्याकडे दिला. त्या प्रसंगाने जयंत पाटील भारावून गेले. 

सानिया ही गजानन हायस्कूल गोमेवाडी येथे शिकत असून कुटुंबीयांनी खाऊसाठी दिलेल्या पैशाची गेल्या तीन वर्षापासून बचत करून ठेवलेले सर्व पैसे जयंत पाटील यांच्याजवळ मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिले आहेत. तिचे वडील मोलमजुरी करतात. या वेळी जयंत पाटील यांनी या मुलीचे कौतुक केले. कोरोनाच्या विरोधातील लढाईत आपल्या परीने खारीचा वाटा उचलू पाहणाऱ्या सानियाचे मंत्री जयंत पाटील यांनी त्यांच्या फेसबुक पेजवरूनही कौतुक केले आहे. 

"आटपाडी तालुक्‍यातील सानिया देवकुळे या आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने गेली तीन वर्षांपासून साठवलेले खाऊचे पैसे मुख्यमंत्री सहायता निधीला देऊन एक आदर्श निर्माण केला आहे. इतक्‍या लहान वयात उपजत असलेली सामाजिक जाणिव पाहून अभिमान वाटला. या मुलांसाठी आपल्याला आशादायी भविष्य निर्माण करायचे आहे,' असे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हटले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com