हिंदकेसरी खंचनाळे यांच्या उपचाराची संपूर्ण जबाबदारी स्वीकारणार :  सतेज पाटील - Satej Patil to lift medical Expenses of Shripati Khanchnale | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात उमुख्यमंत्री अजित पवार राजभवनावर दाखल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही थोड्याच वेळात पोचणार

हिंदकेसरी खंचनाळे यांच्या उपचाराची संपूर्ण जबाबदारी स्वीकारणार :  सतेज पाटील

सरकारनामा ब्युरो
रविवार, 22 नोव्हेंबर 2020

रताचे पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे (वस्ताद) यांची तब्येत खालावली असून कोल्हापूरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये ते उपचार घेत आहेत. कुस्ती क्षेत्रात कोल्हापूरचे नाव उज्ज्वल करणारे खंचनाळे यांच्या उपचाराच्या खर्चाची संपूर्ण जबाबदारी कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी घेतली आहे

कोल्हापूर : भारताचे पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे (वस्ताद) यांची तब्येत खालावली असून कोल्हापूरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये ते उपचार घेत आहेत. कुस्ती क्षेत्रात कोल्हापूरचे नाव उज्ज्वल करणारे खंचनाळे यांच्या उपचाराच्या खर्चाची संपूर्ण जबाबदारी कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी घेतली आहे.

आज पालकमंत्री पाटील  रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करणार आहेत. संपूर्ण भारतातील कुस्तीगीरांसाठी प्रेरणा आणि आदर्श असणारे श्रीपती खंचनाळेजी लवकरात लवकर बरे होवोत, अशी प्रार्थना पाटील यांनी केली.

पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांना प्रकृती अस्वस्थ्यामुळे कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ते अतिदक्षता विभागात असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आले आहे. शहाऐंशी वर्षीय खंचनाळे काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना शहरातील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. तेथे ते तीन दिवस उपचार घेत होते. प्रकृती नाजूक झाल्याने त्यांना महावीर महाविद्यालयाच्या परिसरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. 

खंचनाळे मूळचे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील एकसंबा येथील आहेत. त्यांनी १९५९ ला पंजाब केसरी बनाता सिंग याला पराभूत करत हिंदकेसरी गदा मिळवून कोल्हापूर जिल्ह्याचे नाव उज्वल केले आहे. याच वर्षी त्यांनी कराड येथे आनंद शिरगावकर यांना दोन मिनिटांत अस्मान दाखवत महाराष्ट्र केसरी किताब पटकावला. त्यांनी १९५८, १९६२ व १९६५ ला झालेल्या ऑल इंडिया चॅम्पियन स्पर्धाही जिंकल्या आहेत. 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख