भाजपचे तालुकाध्यक्ष देणार कोविड रुग्ण आणि नातेवाइकांसाठी दोन वेळचे मोफत जेवण

कोविड सेंटर, रेमडेसिव्हिर इंजेक्शन, व्हेंटिलेटर बेड,ऑक्सिजनचा पुरवठा याबाबत तालुक्याकडे सर्वपक्षीय नेत्यांचे दुर्लक्ष आहे.
BJP taluka president of Mangalwedha will provide two times free meals to Kovid patients and their relatives
BJP taluka president of Mangalwedha will provide two times free meals to Kovid patients and their relatives

मंगळवेढा (जि. सोलापूर) : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीनंतर मंगळवेढा तालुक्यात कोरोना विषाणूचा उद्रेक झाला आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोटनिवडणुकीनंतर नेतेमंडळींनी जनतेला वाऱ्यावर सोडले असले तरी काहीजण मात्र कोविड रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांसाठी विविध उपक्रम राबवत आहेत. भारतीय जनता पक्षाचे मंगळवेढा तालुकाध्यक्ष गौरीशंकर बुरकुल यांनी मंगळवेढा शहरातील रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाइकांच्या दोन वेळच्या जेवणाची सोय केली आहे.
    
पंढरपूर विधानसभेची पोटनिवडणूक 17 एप्रिल रोजी पार पडली. प्रचारादरम्यान सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी दुर्लक्षित झालेल्या तालुक्यात विकासाच्या बाता मारताना भविष्यात मोठ्या प्रमाणात निधीची घोषणादेखील केल्या आहेत. पण, वाढत्या कोरोनाच्या रुग्णसंख्येकडे मात्र सोईस्कररित्या दुर्लक्ष केले जात आहे. त्यातच निवडणूक संपताच  वाढलेल्या कोरोनाला नागरिकच जबाबदार असल्याचे सांगत त्याचे खापर नागरिकांवर फोडण्यात येत आहे. 

एकीकडे राज्यात कोरोनाचे आकडे वाढत असताना पंढरपूर-मंगळवेढ्यात मात्र सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या सभेचे पीक वाढले होते. त्या वेळी या दोन्ही तालुक्याच्या विकासाच्या आणाभाका घेणाऱ्या राजकीय नेत्यांनी सध्याच्या वाढत्या कोरोनाच्या संसर्गाकडे मात्र दुर्लक्ष केले आहे. कोविड सेंटर, रेमडेसिव्हिर इंजेक्शन, व्हेंटिलेटर बेड, ऑक्सिजनचा पुरवठा याबाबत तालुक्याकडे सर्वपक्षीय नेत्यांचे दुर्लक्ष आहे.

निवडणुकीतील मतदानानंतर सर्वच प्रमुख राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आपल्या पक्षाच्या उमेदवाराच्या विजयासाठीच्या मताची आकडेमोड सुरू केली आहे. मात्र, भारतीय जनता पक्षाचे मंगळवेढा शहरात युवकाचे संघटन केलेले तालुकाध्यक्ष गौरीशंकर बुरकुल यांनी कोरोनाकाळात एक समाजोपयोगी उपक्रम सुरू केला आहे. सध्या मंगळवेढा शहरातील कोविड रुग्णालयांत असलेल्या रुग्णांबरोबर नातेवाईकांचीही उपासमार होऊ नये; म्हणून रूग्णांबरोबर एका नातेवाइकाला मोफत दोन वेळचे जेवण देण्याचा निर्णय घेतला आहे.

उद्यापासून (ता. 27 एप्रिल) 15 मेपर्यंत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी नातेवाईकांनी दुपारच्या जेवणासाठी दहा ते अकरा या वेळेत आणि रात्रीच्या जेवणासाठी सायंकाळी सहा ते सात या वेळेत फोन करून उपचार घेत असलेल्या दवाखान्याचा पत्ता देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संबंधित रुग्ण आणि त्याच्याबरोबच्या एका नातेवाईकास संबंधित रुग्णालयात जेवण पोच केले जाहीर करण्यात येणार आहे. त्यासाठी गरजूंनी गौरीशंकर बुरकुल मित्रमंडळाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com