ठाणे जिल्ह्यातील ३७६ ग्रामपंचायतींवर कोरोनामुक्तीचा झेंडा - 376 Grampanchyats in Thane District Get Corona Free | Politics Marathi News - Sarkarnama

ठाणे जिल्ह्यातील ३७६ ग्रामपंचायतींवर कोरोनामुक्तीचा झेंडा

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 7 डिसेंबर 2020

ठाणे जिल्ह्यामधील पाच तालुक्‍यांतील ३७६ ग्रामपंचायती कोरोनामुक्त म्हणून जाहीर झाल्या आहेत. गेल्या २८ दिवसांमध्ये या ग्रामपंचायतींमध्ये एकही नवीन रुग्ण न आढळून आल्याने जिल्हा परिषद प्रशासनातर्फे या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात हिरवा झेंडा लावला जाणार आहे.

ठाणे  : ठाणे जिल्ह्यामधील पाच तालुक्‍यांतील ३७६ ग्रामपंचायती कोरोनामुक्त म्हणून जाहीर झाल्या आहेत. गेल्या २८ दिवसांमध्ये या ग्रामपंचायतींमध्ये एकही नवीन रुग्ण न आढळून आल्याने जिल्हा परिषद प्रशासनातर्फे या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात हिरवा झेंडा लावला जाणार आहे.

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, कल्याण, भिवंडी, शहापूर आणि मुरबाड या तालुक्‍यांमध्ये एकूण कोरोनाबाधितांची संख्या १८ हजार २७०; तर मृतांची संख्या ५६५ वर पोहोचली होती. त्यामुळे करोनारुग्णांची साखळी तोडण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून अनेक ग्रामीण भागातील प्रतिबंधित क्षेत्र घोषित करणे, त्या क्षेत्रातील घरांचे सर्वेक्षण करणे आदी उपाययोजना राबवल्या जात आहेत. यासोबतच ज्या ग्रामपंचायतींमध्ये २८ दिवसांत एकही नवीन रुग्ण नाही, अशा ग्रामपंचातींच्या क्षेत्रात कोरोनामुक्तीचा हिरवा झेंडा लावण्याची घोषणा जिल्हा परिषदेने केली होती. 

या उपक्रमाला ग्रामपंचायतींकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने त्याची फलश्रुती म्हणून ठाणे जिल्ह्यातील ४३० ग्रामपंचायतींपैकी ३७६ ग्रामपंचायती कोरोनामुक्त झाल्या आहेत. यामध्ये, मुरबाड तालुक्‍यातील सर्वाधिक १२३ ग्रामपंचायती कोरोनामुक्त झाल्या आहेत. दरम्यान, ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात जिल्हा परिषद प्रशासन, आरोग्य विभाग, आशा, अंगणवाडी सेविकांकडून नागरिकांची जनजागृती केली जात असल्याने त्याचा फायदाही ग्रामीण भागात होताना दिसत आहे.

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख


28 दिवसांत एकही दिवस रुग्ण नाही
तालुका एकूण ग्रामपंचायती कोरोनामुक्त ग्रामपंचायती
अंबरनाथ २८ २२
भिवंडी १२१ ९७
कल्याण ४६ ३७
मुरबाड १२६ १२३
शहापूर ११० ९७