आजचा वाढदिवस : माजी आमदार अनिल कदम, निफाड विधानसभा मतदारसंघ. - Todays Birthday...Ex MLA Anil Kadam Shivsena Politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पूजा चव्हाण मृत्यप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा

आजचा वाढदिवस : माजी आमदार अनिल कदम, निफाड विधानसभा मतदारसंघ.

संपत देवगिरे
रविवार, 24 जानेवारी 2021

निफाड विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम मिग विमानांचा कारखाना आणि द्राक्षांची पंढरी असलेल्या मात्र सध्या अतिशय वेगाने शहरीकरण झालेल्या ओझर मीग येथील आहेत. त्यांचे शिक्षण इंग्रजी शाळेत झाले आहे.

नाशिक : निफाड विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम मिग विमानांचा कारखाना आणि द्राक्षांची पंढरी असलेल्या मात्र सध्या अतिशय वेगाने शहरीकरण झालेल्या ओझर मीग येथील आहेत. त्यांचे शिक्षण इंग्रजी शाळेत झाले आहे.

मराठी, हिंदी यांसह ते अतिशय सफाईदार इंग्रजी बोलतात. त्यांचा स्वभाव आक्रमक अन्‌ काहीसा रागीट म्हणावा असा आहे. तेच त्यांचे राजकीय मायलेज देखील आहे. त्यामुळे शासकीय अधिकारी, सरकारी समस्या, आंदोलने सार्वजनिक असो वा मतदारांचे प्रश्‍न यावर ते प्रशासनाला धारेवर धरतात. त्यामुळेत त्यांच्या या स्वभावाला दाद देणारा एक वर्ग त्यांनी निफाड मतदारसंघात निर्माण केला आहे. आक्रमक स्वभावामुळे अनेकदा पंगा घ्यावा लागल्याने ते अडचणीत देखील आलेले आहेत. 

ओझर ग्रामपंचायतीपासून त्यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरु केली. ग्रामपंचायत सदस्य, प्रभारी सरपंच, दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद सभापती आणि दोन वेळा आमदार असा त्यांचा चढता राजकीय आलेख आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांनी मतदारसंघात जास्तीत जास्ती शिवसेना सदस्य विजयी करण्यासाठी प्रयत्न केले. त्यात काही प्रमाणात यशस्वी झाले आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. शिवसेना त्यात प्रमुख घटक आहे. त्या माध्यमातून मतदारसंघातील संपर्क त्यांनी कायम ठेवला आहे. 
... 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख