Today's Birthday: Pankaja Munde - Former Minister, BJP | Sarkarnama

आजचा वाढदिवस : पंकजा मुंडे (माजी मंत्री, भाजप)

सरकारनामा ब्युरो
रविवार, 26 जुलै 2020

राज्यभरातील विविध मतदार संघात त्यांच्या समर्थकांचे जाळे आहे. ऊसतोड कामगार व समाजातही त्यांच्या शब्दाला मोठी किंमत आहे.

पंकजा मुंडे या दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या ज्येष्ठ कन्या आहेत. भाजपमधील एकमेव मास लिडर अशी त्यांची ओळख आहे. सुरुवातीला जलसंधारण व महिला बचत गटांच्या माध्यमातून सामाजिक कामात उतरलेल्या पंकजा मुंडे यांनी दिवंगत मुंडे प्रथम लोकसभेवर गेल्यानंतर २००९ मध्ये परळी विधानसभेची निवडणुक लढविली. 

त्यानंतर त्यांनी भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्षपदही सांभाळले. २०१४ मध्ये त्यांनी राज्यात ‘पुन्हा संघर्ष यात्रा’च्या माध्यमातून ७९ मतदार संघातून पदयात्रा काढली. या निवडणुकीनंतर महायुती सरकारमध्ये त्यांनी महिला व बालविकास, ग्रामविकास, जलसंधारण, रोहयो अशा महत्वाच्या खात्यांचे मंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम केले. 

दरम्यान, २०१४ मध्ये झालेल्या पराभवाचा वचपा या निवडणुकीत चुलतबंधू धनंजय मुंडे यांनी काढला. दरम्यान, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना, वैद्यनाथ बँक, गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान, वैद्यनाथ सर्वांगीन विकास संस्था त्यांच्या अधिपत्याखाली आहे. राज्यभरातील विविध मतदार संघात त्यांच्या समर्थकांचे जाळे आहे. ऊसतोड कामगार व समाजातही त्यांच्या शब्दाला मोठी किंमत आहे.
Edited by : Mangesh Mahale

हेही वाचा : मुंबई- सुरतपेक्षा, मुंबई- नागपूर बुलेट ट्रेन द्या.... 

पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत आज सामनामधून प्रसिद्ध करण्यात आली. सामनाचे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे.  बुलेट ट्रेनचं नक्की भविष्य काय? या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले, "प्रत्येक गोष्टीची केवळ एकच बाजू नसते. अनेक बाजू असू शकतात. यात आपण स्थानिक लोकांचा विचार करणं फार महत्त्वाचं आहे. राज्य म्हणून बुलेट ट्रेनची आवश्यकता असेल तर मी म्हणेन, माझ्या मुंबई-नागपूरला जोडणारी बुलेट ट्रेन द्या. माझी राजधानी आणि उपराजधानी जोडणारी ट्रेन द्या. जेणेकरून विदर्भाच्या मनात कारण नसताना जो दुरावा करून दिला जाण्याचा प्रयत्न केला जातो, तो दुरावा नष्ट होईल. जसा समृद्धी महामार्ग होतोय, त्याला आता शिवसेनाप्रमुखांचं नाव दिलं आहे. तसंच मुंबई-नागपूर जोडणारी बुलेट ट्रेन द्या. मला आनंद होईल."

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख