आजचा वाढदिवस: गिरीश महाजन  - Today's birthday: Girish Mahajan | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

आजचा वाढदिवस: गिरीश महाजन 

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 17 मे 2021

गिरीश महाजन यांना पक्षाचे संकटमोचक म्हटले जाते.

जळगाव : भारतीय जनता पक्ष (BJP) अडचणीत असताना अनेकवेळा चर्चेच्या माध्यमातून यशस्वी मध्यस्थी करून पक्षाला संकटातून बाहेर काढण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यामुळे भाजप नेते व माजी मंत्री आमदार गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना पक्षाचे संकटमोचक म्हटले जाते. जळगाव जिल्ह्यातील जामनेर विधानसभा मतदार संघातून तब्बल सहा वेळा ते निवडून आले आहेत. घरात कोणताही राजकीय वारसा नव्हता वडील शिक्षक होते. मात्र, लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार होते. महाविद्यालयीन काळात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्य केले, त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चात सहभागी झाले, ते युवा मोर्चाचे प्रदेशाधयक्ष होते. त्यानंतर जामनेर भाजपचे कार्यकर्ते म्हणून त्यांनी कार्य सुरू केले. (Today's birthday: Girish Mahajan)

माउंटबॅटनची पत्नी एडविनाच्या पत्रांत भारताविषयी दडलंय काय? पत्रं सार्वजनिक करण्यास ब्रिटनचा नकार

भारतीय जनता पक्षाने त्यांना सन १९९५ मध्ये जामनेर मतदार संघातून विधानसभेची उमेदवारी दिली, यावेळी ते प्रचंड मताधिक्याने निवडून आले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यांच्या पत्नी साधना महाजन या जिल्हा परिषद सदस्य पदी निवडून आल्या. त्यानंतर जामनेर ग्रामपंचायतीच्या त्या सरपंच झाल्या, जामनेर नगरपालिका झाल्यानंतर नगराध्यक्षपदी त्या विराजमान झाल्या.

२०१४ मध्ये राज्यात युतीचे सरकार आल्यानंतर महाजन याना राज्याचे जलसंपदा व आरोग्य शिक्षण मंत्री पदी वर्णी लागली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे विस्वासू मंत्री म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली. राज्यातील फडणवीस यांच्या सरकारवर ज्या ज्या वेळी आपत्ती आली त्या वेळी गिरीश महाजन यांनी यशस्वी मध्यस्थी करून फडणवीस सरकारला अडचणीतून बाहेर काढले.  २०१६ मध्ये पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप झाले आणि त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. 

त्यानंतर गिरीश महाजन यांना भाजपने अधिक जबाबदारी दिली उत्तर महाराष्ट्र तसेच राज्याच्या राजकरणात महाजन यांचे महत्व वाढले. राज्यात शेतमजूर, शेतकरी यांचे मोर्चे निघाले. त्यावेळी त्यांनी चर्चेद्वारे यशस्वी मध्यस्थी केली. त्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्र सरकार विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला, त्यावेळी चर्चा करून आंदोलन न करण्याबाबत मध्यस्थी महाजन यांनी केली. त्यानंतर उत्तर महाराष्ट्रात नगर, नाशिक महानगपालिका भाजपकडे घेण्यासाठी त्यांनीच यशस्वी प्रयत्न केले. त्यामुळे त्यांना भाजपचे संकटमोचक म्हटले जाऊ लागले. 

राजीव सातव;शांत स्वभावाचा दिलदार मित्र

पुढे धुळे आणि जळगाव महापालिकावर त्यांनी भाजप चा झेंडा फडकवला. भाजपच्या केंद्रीय नेत्यांचा विस्वास त्यांनी संपादन केला. त्यामुळे पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत अमित शहा (Amit Shah) यांनी त्यांना प्रचाराची जबाबदारी दिली होती, तब्बल वीस दिवस ते प्रचारात होते. अमित शहा यांनी त्यांचा जाहीर उल्लेख केला होता. पक्षाचा साधा कार्यकर्ता ते राज्याचा नेता अशी त्यांची यशस्वी भरारी राहिली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख