आजचा वाढदिवस : माजी आमदार दिलीप माने 

सत्ता असो वा नसो माजी आमदार माने यांच्याकडे सर्वसामान्यांची कायमच गर्दी राहिली आहे.
Today's birthday: Former MLA Dilip Mane .jpg
Today's birthday: Former MLA Dilip Mane .jpg

सोलापूर : सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप माने  (MLA Dilip Mane) यांचा आज वाढदिवस आहे. सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात दिलीप माने व त्यांचे वडील माजी आमदार कै. ब्रह्मदेवदादा माने यांचे निर्णायक अस्तित्व राहिले आहे. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघ, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती या महत्त्वाच्या संस्थांमध्ये माने परिवाराचे मोठे योगदान आहे. (Today's birthday: Former MLA Dilip Mane) 

2014 मध्ये सोलापूर दक्षिण या विधानसभा मतदारसंघातून दिलीप माने यांनी आमदारकीसाठी नशीब आजमावले होते. त्यानंतर 2019 मध्ये सोलापूर शहर मध्यमध्ये त्यांनी आमदारकीसाठी नशीब आजमावले आहे. आगामी काळात सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानपरिषद मतदारसंघातून मतदारसंघातील आमदारकीचे प्रमुख दावेदार म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जात आहे.

सत्ता असो वा नसो माजी आमदार माने यांच्याकडे सर्वसामान्यांची कायमच गर्दी राहिली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात माने यांची भूमिका महत्त्वाची व निर्णायक असणार आहे.     

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com