आजचा वाढदिवस : माजी मंत्री पंकजा मुंडे

जलसंधारण खात्यामध्ये त्यांनी केलेल्या कामाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली.
 Pankaja Munde .jpg
Pankaja Munde .jpg

बीड : भाजपच्या राष्ट्रीय सचिव व मध्यप्रदेश भाजपच्या सहप्रभारी पंकजा मुंडे या दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जेष्ठ कन्या आहेत. भाजपमधील मास लिडर अशी त्यांची ओळख आहे. सुरुवातीला जलसंधारण व महिला बचत गटांच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कामाला सुरुवात केली. दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांनी प्रथम लोकसभा निवडणुक लढवल्यानंतर २००९ मध्ये परळी विधानसभेची निवडणुक पंकजा मुंडे यांनी लढविली. त्या निवडणुकीत त्यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला होता. (Today's birthday: Former Minister Pankaja Munde)  

त्यानंतर त्यांनी भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्षपदही सांभाळले. २०१४ मध्ये त्यांनी राज्यात 'पुन्हा संघर्ष यात्रे'च्या माध्यमातून ७९ मतदार संघातून पदयात्रा काढली. या निवडणुकीनंतर महायुती सरकारमध्ये त्यांनी महिला व बालविकास, ग्रामविकास, जलसंधारण, रोहयो अशा महत्वाच्या खात्यांचे मंत्रीपद व बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून काम केले. जलसंधारण खात्यामध्ये त्यांनी केलेल्या कामाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली. 

दरम्यान, वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना, वैद्यनाथ बँक, गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान, वैद्यनाथ सर्वांगीन विकास संस्था त्यांच्या अधिपत्याखाली आहे. राज्यभरातील विविध मतदार संघात त्यांच्या समर्थकांचे जाळे आहे. ऊसतोड कामगार व समाजातही त्यांच्या शब्दाला मोठी किंमत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षणाच्या विषयावर काही दिवसांपूर्वी त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने राज्यभर 'चक्का जाम' आंदोलन केले होते.

पंकजा मुंडे या ओबीसी समाजाचा चेहरा आहे. त्यांना राजकीय घराण्याचा वारसा आहे. सध्या त्या भाजपमध्ये राष्ट्रीय पातळीवर काम करत आहेत. राज्यातही त्या भाजपच्या महत्त्वाच्या नेत्या म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. 

Edited By - Amol Jaybhaye 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com