आजचा वाढदिवस : सुप्रिया सुळे (खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस)  - Today Birthday Supriya Sule MP NCP | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

आजचा वाढदिवस : सुप्रिया सुळे (खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस) 

मिलिंद संगई 
बुधवार, 30 जून 2021

निवडणुकांपूर्वी राजकारण आणि नंतर कायम समाजकारण ही त्यांची वेगळी खासियत म्हणावी लागेल.

बारामती : घरात राजकारणाचा वसा असताना देखील सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून आपले वेगळे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी सुरवातीपासूनच केला. निवडणुकांपूर्वी राजकारण आणि नंतर कायम समाजकारण ही त्यांच्या जीवनाची देखील एक वेगळी खासियत म्हणावी लागेल. पवार कुटुंबियांचे राजकीय वलय असताना देखील अत्यंत साधेपणाने राहणीमान ठेवत तळागाळातील प्रत्येक व्यक्तींचे प्रश्न सोडविण्याचा त्या प्रयत्न  करतात. Today Birthday Supriya Sule MP NCP

आपण ज्या लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतो आहोत त्या लोकसभा मतदारसंघातील प्रश्नांचा आवाज त्यांनी लोकसभेत उठवत त्या प्रश्नांना योग्य न्याय देत या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न मनापासून केला. लोकसभेतील त्यांची उपस्थिती , त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे,  त्यांची कामगिरी आणि त्याबद्दल त्यांना मिळालेले अनेक पुरस्कार  ही त्यांच्या कामाची पावती आहे. देशातील सर्व खासदारांमध्ये त्यांची कामगिरी नेहमीच उजवी राहिली आहे.  देशांमधील क्रमांक एकचा लोकसभा मतदारसंघ व्हावा या दृष्टिकोनातून त्यांचे सातत्याने प्रयत्न सुरू असतात . 

राष्ट्रीय वयोश्री योजने सारख्या योजनेमध्ये देशात सर्वोत्तम कामगिरी सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून झाली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्व दिव्यांगांना आवश्यक सोयी सुविधा मिळाव्यात तसेच कर्णबधिर व इतर व्यक्तींना देखील आवश्यक साधनसामग्री मिळावी या दृष्टिकोनातून त्यांचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत. 

रेल्वे, पोस्ट किंवा इतर केंद्रीय मंत्रालयाशी संबंधित सर्व विषय संबंधित मंत्री व सचिव यांच्याशी चर्चा करून तातडीने सोडविण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न असतो.  आपल्या लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळावा, त्याला कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागू नये यासाठी त्या सातत्याने आपल्या मतदारसंघात फिरत असतात. राजकीय वलय दूर सारून प्रत्येक व्यक्तीची वैयक्तिक भेट घेऊन त्याच्या भावना समजून घेण्याचा मनापासून प्रयत्न सुप्रिया सुळे यांनी आजपर्यंत केला आहे. 

देशाच्या पंतप्रधानापासून ते मतदारसंघातील अगदी तळातील घटकांपर्यंत प्रत्येकाशी त्यांनी वैयक्तिक संबंध निर्माण केले आहेत.  केवळ एक राजकीय व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख न ठेवता आमच्या कुटुंबातील एक सदस्य अशी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.  बारामती लोकसभा मतदारसंघातील विद्यार्थिनींना सायकल वाटपाचा उपक्रम असो किंवा बारामती सारख्या शहरांमध्ये पासपोर्ट कार्यालय सुरू करण्याचा विषय अशी अनेक विकास कामे सुप्रिया सुळे यांनी अतिशय वेगाने मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे. खासदार म्हणून त्याची कामगिरी सर्वोत्तम असून सर्व प्रश्नांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होत आहे.  युवक- युवती महिला तसेच शेतकरी यांच्यासह समाजातील प्रत्येक घटकाला चांगले राहणीमान मिळावे, त्याला सर्व सुविधा मिळाव्यात या माध्यमातून सुळे दोन दशकांपासून प्रयत्न सुरू आहेत.  
 
Edited by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख