आजचा वाढदिवस : (डॉ. प्रितम मुंडे, खासदार, भाजप)

पावणेदोन लाखांवर मतांनी विजय मिळवत दुसऱ्यांदा प्रितम मुंडे यांनी लोकसभेत प्रवेश केला.
pritam17.jpg
pritam17.jpg

बीड : खासदार डॉ. प्रितम मुंडे या दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या द्वितीय कन्या आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या धाकट्या भगिनी आहेत.

वैद्यकीय क्षेत्रात पदवी (एम. बी. बी. एस) व सौंदर्यशास्त्रात पदव्युत्तर पदवी (एम. डी. डर्मेटॉलॉजी) मिळविलेल्या डॉ. प्रितम मुंडे दुसऱ्या वेळी बीड लोकसभा मतदार संघाच्या खासदार आहेत. वडिल दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे राजकारणात होते तरी विवाहापूर्वी वा नंतर त्यांचा राजकारणात कुठलाही वावर नव्हता.

नाशिक येथील गौरव खाडे यांच्याशी विवाहानंतर त्या गृहीणी आणि वैद्यकशास्त्रात काम करत होत्या. दरम्यान, २०१४ मध्ये गोपीनाथराव मुंडे यांच्या अकाली दुर्दैवी निधनाने लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उतरलेल्या डॉ. प्रितम मुंडे यांनी विक्रमी मतांनी विजय मिळविला. २०१९ च्या निवडणुकीतही त्यांनी पावणेदोन लाखांवर मतांनी विजय मिळवत दुसऱ्यांदा लोकसभेत प्रवेश केला.

हेही वाचा : मुख्यमंत्रीपद लाटताना द्विधा मन:स्थिती नव्हती..?

मुंबई : टिकटाँकस्टार पूजा चव्हाण हिच्या मृत्यूप्रकरणाशी शिवसेनेचे नेते संजय राठोड यांचा संबंध असल्याचा आरोप भाजपने केला आहे. यावरून भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. याबाबत भातखळकर यांनी टि्वट केलं आहे. आपल्या टि्वटमध्ये भातखळकर म्हणतात की, युतीला मिळालेला जनमताचा कौल डावलून लाचारीने मुख्यमंत्रीपद लाटताना फक्त द्विधा मन:स्थिती नव्हती. बाकी वनमंत्री संजय राठोडांवर कारवाई करताना मात्र मुख्यमंत्र्यांची मन:स्थिती नेहमीप्रमाणे द्विधा झाली आहे म्हणे, ही मनस्थिती द्विधा नसून निर्लज्ज आणि निबर मनस्थिती आहे.

राज्यात काही दिवसात वाढत चालेल्या गुन्हेगारीबाबत अतुल भातखळकर म्हणतात, "महाराष्ट्रात आता दरोडेखोर पोलिसांचा गणवेश घालून दरोडे टाकू लागले आहेत. घरबसलेल्या मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना भारतरत्नांची चौकशी, भाजपच्या आयटी सेलची चौकशी अशा महत्वपूर्ण कारवायांमुळे असल्या किरकोळ गुन्ह्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही." शेतकरी आंदोलनाबाबत भातखळ आपल्या टि्टवमध्ये म्हणतात की राकेश टिकैत यांच्या आंदोलनाचे शेतकरी हिताशी काहीही देणे घेणे नाही, हे आंदोलन मोदी सरकारच्या द्वेषाने पछाडलेले आहे.   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com