आजचा वाढदिवस : डॉ. भारतभूषण क्षीरसागर (नगराध्यक्ष, बीड नगरपालिका) - Today birthday Dr Bharatbhushan Kshirsagar Mayor Beed Municipality | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात उमुख्यमंत्री अजित पवार राजभवनावर दाखल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही थोड्याच वेळात पोचणार

आजचा वाढदिवस : डॉ. भारतभूषण क्षीरसागर (नगराध्यक्ष, बीड नगरपालिका)

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 17 फेब्रुवारी 2021

वीस वर्षे स्वत:कडे नगराध्यक्षपद ठेवण्यात डॉ. भारतभूषण क्षीरसागर यशस्वी झाले आहेत.

बीड : मागील ३५ वर्षांत अपवाद वगळता बीड नगरपालिकेच्या सत्तेची दोर स्वत:च्या हातात ठेवणाऱ्या आणि साधारण २० वर्षे स्वत:कडे नगराध्यक्षपद ठेवण्यात डॉ. भारतभूषण क्षीरसागर यशस्वी झाले आहेत. राज्यात एवढ्या काळ नगराध्यक्षपदी असलेले कदाचित ते एकमेव असावेत. म्हणूनच त्यांची बीड जिल्ह्यात ‘अध्यक्ष’ अशीच ओळख निर्माण झालेली आहे. सध्याही ते बीड नगरपालिकेचे नगराध्यक्ष असून शिवसेनेत कार्यरत आहेत.

दिवंगत लोकनेत्या माजी खासदार केशरकाकू क्षीरसागर यांचे चिरंजीव आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे बंधू असलेले डॉ. क्षीरसागरही सध्या शिवसेनेत आहे. काँग्रेसमधून राजकारणाला सुरुवात केल्यानंतर त्यांनी संघटनेची विविध पदे सांभाळली. युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशा पदांवर त्यांनी काम केले. क्रीडा क्षेत्राचाही सर असलेले डॉ. क्षीरसागर यांनी रणजी क्रिकेटमध्येही प्रतिनिधित्व केले. बीड शहराच्या भौगोलिक क्षेत्राची खडानखडा माहिती असलेल्या डॉ. क्षीरसागर यांना इथल्या राजकारणाचीही तेवढीच माहिती आहे.

डॉ. प्रितम मुंडे (खासदार, भाजप)

खासदार डॉ. प्रितम मुंडे यांचा आज वाढदिवस. डॉ. प्रितम मुंडे या दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या द्वितीय कन्या आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या धाकट्या भगिनी आहेत. वैद्यकीय क्षेत्रात पदवी (एम. बी. बी. एस) व सौंदर्यशास्त्रात पदव्युत्तर पदवी (एम. डी. डर्मेटॉलॉजी) मिळविलेल्या डॉ. प्रितम मुंडे दुसऱ्या वेळी बीड लोकसभा मतदार संघाच्या खासदार आहेत. वडिल दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे राजकारणात होते, तरी विवाहापूर्वी वा नंतर त्यांचा राजकारणात कुठलाही वावर नव्हता. नाशिक येथील गौरव खाडे यांच्याशी विवाहानंतर त्या गृहीणी आणि वैद्यकशास्त्रात काम करत होत्या. दरम्यान, २०१४ मध्ये गोपीनाथराव मुंडे यांच्या अकाली दुर्दैवी निधनाने लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उतरलेल्या डॉ. प्रितम मुंडे यांनी विक्रमी मतांनी विजय मिळविला. २०१९ च्या निवडणुकीतही त्यांनी पावणेदोन लाखांवर मतांनी विजय मिळवत दुसऱ्यांदा लोकसभेत प्रवेश केला.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख