आजचा वाढदिवस : उन्मेष पाटील (भाजप खासदार, जळगाव ) - Today Birthday BJP MP Unmesh Patil Jalgaon | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

आजचा वाढदिवस : उन्मेष पाटील (भाजप खासदार, जळगाव )

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 24 जून 2021

बेलगंगा  कारखाना सुरु करण्यासाठी आंदोलन सुरू केले. यातून उन्मेष पाटील यांचे नेतृत्व पुढे आले.

जळगाव  : चाळीसगाव तालुक्यातील बंद पडलेला बेलगंगा साखर कारखाना सुरू करण्यासाठी कोणताही राजकीय वारसा नसताना युवक उन्मेष पाटील यांनी आंदोलन पुकारले आणि यातूनच पुढे आमदार ते  खासदार अशी राजकीय नेतृत्वापर्यंत त्यांनी मजल गाठली. Today Birthday BJP MP Unmesh Patil Jalgaon

भारतीय जनता पक्षाचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे खासदार उन्मेष पाटील हे बी. ई.मेकनिक आहेत. घरात कोणताही राजकीय वारसा नव्हता, शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी चाळीसगाव तालुक्यातील बंद पडलेल्या बेलगंगा साखर कारखाना सुरु करण्यासाठी आंदोलन सुरू केले. यातून त्यांचे नेतृत्व पुढे आले. 

२०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीत त्यांना भारतीय जनता पक्षाने चाळीसगाव मतदार संघातून उमेदवारी दिली अन ते विजयी होऊन आमदार झाले. त्यानंतर २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांना जळगाव लोकसभा मतदार संघातून ऐनवेळी उमदेवार घोषित केले ते प्रचंड मताधिक्याने विजयी झाले अन् खासदार झाले.

भाजपने जळगावच्या जागेवर विद्यमान खासदाराचे तिकीट कापून जाहीर केलेल्या उमेदवारालाही अखेरच्या क्षणी खाली बसवत तिसराच उमेदवार आमदार उन्मेष पाटलांच्या रुपाने दिला होता. या तिकीट कापाकापीमुळे पक्षांतर्गत नाराजी काबूत ठेवण्याची खेळी भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी करून दाखविली होती.

ओबीसी नेत्यांचे माकड झाले, मलिदा खाण्यासाठी ते सत्तेमध्ये आहेत का? 
 
सांगली : ''महाविकास आघाडी सरकारमधील ओबीसी नेते हे काका पुतण्याच्या ताटाखालचे मांजर झाले आहे. सरकारमध्ये ओबीसी नेत्यांचे माकड झाले आहे. ओबीसी मंत्र्याच्या शब्दाला कवडीची किंमत राहिली नाही,'' अशी  टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.  सांगलीच्या झरे येथे माध्यमांशी ते बोलत होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख