आजचा वाढदिवस : गुलाबराव पाटील (पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री)  

पानटपरी चालक राज्याचा मंत्री झाला..
4gulabrao_patil_5june_birthd.jpg
4gulabrao_patil_5june_birthd.jpg

जळगाव  : गुलाबराव रघुनाथ पाटील शिवसेना उपनेते, व राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आहेत. शिवसेनेत कार्यकर्ता म्हणून त्यांनी कार्यास सुरुवात केली. अत्यंत उत्कृष्ठ भाषणशैली तसेच आक्रमकपणा यामुळे शिवसेना पक्षात त्यांचे कार्य ठळकपणे दिसून आले. जनतेच्या प्रश्नासाठी त्यांनी कार्यकर्ता  असताना शिवसेना पद्धतीने आंदोलन केले. त्यामुळे जनतेवर त्यांनी पकड निर्माण केली.  ग्रामपंचात सदस्य, जिल्हापरिषद सदस्यपदी ते निवडून आले.  Today Birthday  Gulabrao Patil Minister of Water Supply and Sanitation

सन १९९९ मध्ये एरंडोल विधानसभा मतदार संघातून त्यांना शिवसेनेतर्फे थेट बाळासाहेब ठाकरे यांनीच उमेदवारी जाहीर केली आणि या निवडणुकीत ते विजयी होवून शिवसेनेचे आमदार झाले. त्यानंतर २००४ मध्ये ते पुन्हा याच मतदार संघातून विजयी झाले. परंतु 2008 मध्ये जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघातून त्यांना पराभव पत्करावा लागला. मात्र 2014 मध्ये त्यांनी आपल्या पराभवाचा वचपा काढला आणि याच मतदार संघातून ते निवडून आले. 

युतीची सत्ता आल्यानंतर त्यांना सहकार राज्यमंत्री पद देण्यात आले. सन 2019 मध्ये ते पुन्हा निवडून आले. राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला, तसेच शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाचे आघाडी सरकार आले. त्याच्याकडे राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता हे कॅबिनेट मंत्रिपद आहे. शिवसेनेचा कार्यकर्ता व आपल्या चरितार्थासाठी पानाची टपरी ते पाळधी येथे चालवीत होते. नशीब पान सेंटर असे नाव दिले होते. मात्र, पुढे त्यांचे खऱ्या अर्थाने नशीब निघाले आणि एक पानटपरी चालक राज्याचा मंत्री झाला.
 

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये भाजपचा पराभव, निवडणुकीनंतरचा हिंसाचार, उत्तरप्रदेशातील राजकीय वातावरण, किसान आंदोलन, कोरोनासाठीच्या उपाययोजना आदी विषयावर आज दिल्लीत राष्ट्रीय स्वंयसेवक संघाची RSS बैठक होत आहे. या बैठकीत आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत, संघाचे पदाधिकारी, भाजपचे वरिष्ठ नेता उपस्थित राहणार आहेत. ही बैठक नेहमीप्रमाणे होणाऱ्या बैठकीसारखी नियोजित बैठक असली तरी सध्याच्या राजकीय वातावरणामुळे या बैठकीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.  ता. ३ जून रोजी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, काही केंद्रीय मंत्री आरएसएसच्या कार्यालयात उपस्थित होते. त्यानंतर या बैठकीचे आयोजन केले जात आहे. 

Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com