आजचा वाढदिवस : देविदास पिंगळे, माजी खासदार - Birthday Devidas Pingle, President, Nashik APMC, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्र्यांकडून 5 हजार 400 कोटींचे पॅकेज जाहिर...
पुढील 15 दिवस संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार...
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू ठेवणार...
नोंदणीकृत घरगुती कामगारांनाही आर्थिक मदत देणार...
नोंदणीकृत फेरीवाल्यांनाही पंधराशे रुपयांची मदत मिळणार...
परवानाधारक रिक्षाचालकांना पंधराशे रुपये देणार...
पुढील महिनाभर गरीबांसाठी मोफत शिवभोजन थाळी...दोन किलो तांदूळ, तीन किलो गहू मिळणार
राज्यात उद्या रात्री आठ वाजल्यापासून संचारबंदी...मुख्यमंत्र्यांची घोषणा

आजचा वाढदिवस : देविदास पिंगळे, माजी खासदार

संपत देवगिरे
शुक्रवार, 12 मार्च 2021

महाराष्ट्रातील आघाडीच्या नाशिक बाजार समितीचे सभापती, माजी खासदार देविदास पिंगळे 2004 ते 2009 या कालावधीत नाशिकचे खासदार होते.

नाशिक : महाराष्ट्रातील आघाडीच्या नाशिक बाजार समितीचे सभापती, माजी खासदार देविदास पिंगळे 2004 ते 2009 या कालावधीत नाशिकचे खासदार होते. राष्ट्रवादी कॅंग्रेस आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी एकनीष्ठ असलेल्या श्री. पिंगळे यांचे जिल्ह्यातील विविध सहकारी संस्थावर वर्चस्व आहे. 

जिल्हा बॅंकेचे ते प्रदिर्घ काळ संचालक होते. नाशिक सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, राज्य सहकारी बॅंकेचे संचालक, मुंबई बाजार समितीचे संचालक, सेंट्रल गोदावरी कृषक सेवा सहकारी संस्खा यांसह विविध संस्थांवर त्यांनी काम केले आहे. 

राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाची संथापना झाल्यावर नाशिक जिल्ह्यात पक्षाचे अवघे दोन सदस्य असतांना श्री. पिंगळे यांनी विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाती निवडणूक एकहाती जिंकून पक्षात एक वेगळे स्थान निर्माण केले. त्यानंतर 2009 साली नाशिकचे खासदार झाले. श्री. पिंगळे गेली पाच वर्षे पक्ष अडचणीत असतांना सत्ताधारी पक्षाकडून विविध प्रकारे त्रास, खटले व कारवाई आदी प्रयोग झाल्यावर देखील पक्षाशी एकनिष्ठ राहिले. 

नाशिक बाजार समितीवरील त्यांचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी तत्कालीन पालकमंत्र्यांनी त्यांच्यावर पोलिस कारवाई केली होती. त्यानंतर संचालकांना हाताशी धरुन त्यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर केला. मात्र राज्यात सत्तांतर होतच श्री. पिंगळे यांनी भारतीय जनता पक्षावर त्यांच्याच डाव उलटवत बाजार समितीची सत्ता पुन्हा काबीज केली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख