मुंबईहून सातारा जिल्ह्यात आलेली महिला पोलिस अधिकारी कोरोना पॉझिटीव्ह

कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत असलेल्या उंब्रजला हळूहळू कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमुळे दणका बसू लागला आहे.
women police officer found corona virus positive in satara district who came from mumbai
women police officer found corona virus positive in satara district who came from mumbai

उंब्रज (सातारा) : उंब्रजमधील कृष्णानगर येथे मुंबईहून आलेल्या एकोणतीस वर्षीय महिला पोलिस अधिकारी मंगळवारी रात्री कोरोना पॉझिटिव्ह आल्याने उंब्रजमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत असलेल्या उंब्रजला हळूहळू कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमुळे दणका बसू लागला आहे. उंब्रजमध्ये ट्रॅव्हल हिस्ट्रीने कोरोनाचा  प्रादुर्भाव वाढू लागल्याने नागरिकांच्या मध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस प्रशासनाने सदर महिला राहात असलेला परिसर रातोरात सील केला आहे. दरम्यान परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांबाबत येथील स्थानिक नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगावी असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय
अधिकारी डॉ संजय कुंभार यांनी केले आहे.

मुंबई येथे पोलिस अधिकारी म्हणून काम करणारी महिला शुक्रवार (ता. २२ मे) रोजी उंब्रज येथे आली‌‌. रविवार (ता. २४) रोजी त्यांना ताप व घशाचा त्रास होऊ लागल्याने येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी गेल्या असता त्यांना तातडीने कराड येथे उपचारासाठी रवाना करण्यात आले. काल रात्री कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट येताच उंब्रज मध्ये पुन्हा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय डॉ संजय कुंभार यांनी तातडीने घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. यामध्ये हाय रिस्क मधील दिड वर्षाच्या बाळासह अन्य चार जणांना कराड येथे इन्स्टिट्यूट क्वारंटाइन करण्याबरोबरच घराशेजारील व नातेवाईक अशा दहा जणांना होम क्वारंटाइन करण्यात आले असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कुंभार यांनी सांगितले.
     
दरम्यान, उंब्रज सह परीसरातील नागरिकांना परजिल्ह्यातून आलेल्या नागरिकांकडून कोरोनाचा अधिक धोका असल्याने नागरिकांनी अधिक सावधगिरी बाळगावी तसेच परजिल्ह्यातून आलेल्या नागरिकांनी होम क्वारंटाइनचे निकष अधिक काळजीपूर्वक पाळावेत असे आवाहन उंब्रज पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अजय गोरड यांनी केले आहे.

कोरोनाविरुद्धच्या लढाईतील कर्तव्ये पार पाडणाऱ्या
 सर्व कर्मचाऱ्यांना 50 लाख रुपयांचं विमा संरक्षण 

मुंबई : कोरोना साथप्रतिबंधक व उपचार कार्याशी संबंधीत कर्तव्ये पार पाडणाऱ्या शासकीय, खाजगी, कंत्राटी, बाह्यस्त्रोतांद्वारे घेतलेले कर्मचारी, मानसेवी, तदर्थ
कर्मचारी अशा सर्व कर्मचारी बांधवांना 50 लाख रुपयांचं विमासंरक्षण पुरवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. 

विमा संरक्षणाची कार्यवाही अंतिम होईपर्यंतच्या कालावधीत कर्तव्यं बजावणाऱ्या संबंधीत कर्मचाऱ्याचा कोरोनानं दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना राज्य शासनाकडून 50 लाख रुपयांचं सानुग्रह अनुदान देण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी आज दिली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com