उल्हासनगरमध्ये कोरोनावरील इंजेक्शनचा काळाबाजार उजेडात 

नीता पंजवानी असं अटक करण्यात आलेल्या महिलेचं नाव असून ती अक्तेमरा (Actemra) हे इंजेक्शन काळ्या बाजारात विकत होती.
 women arrested in ulhasnagr for black marketing of injections
women arrested in ulhasnagr for black marketing of injections

उल्हासनगर :  कोरोना साथीच्या आजारामुळं घाबरलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांच्या मनःस्थितीचा फायदा घेत कोविडवरील इंजेक्शनचा काळा बाजार जोरात सुरू आहे. अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) उल्हासनगरमधील मनीष नगरमध्ये अशाच प्रकरणात एका महिलेला अटक केली आहे. 

नीता पंजवानी असं अटक करण्यात आलेल्या महिलेचं नाव असून ती अक्तेमरा (Actemra) हे इंजेक्शन काळ्या बाजारात विकत होती. सुमारे ४०,५४५ रुपयाचे हे इंजेक्शन ती ६० हजार रुपयांना विकत असताना एफडीएच्या आणि पोलीस अधिकाऱ्यांनी सापळा रचुन तिला रंगेहाथ पकडले.या प्रकरणी उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून उल्हासनगर पुढील तपास करीत आहे. या आरोपी महिलेने सदरचे इंजेक्शन बेकायदेशीररित्या विना बिलाने खरेदी करून ती अधिक किमतीने विनाविक्री बिलाने कोणत्याही औषध विक्री परवाना नसताना विक्री करून फसवणूक करीत असताना मिळून आल्याचे पोलीस गुन्ह्यात नोंद करण्यात आली आहे, पोलीस व एफडीएच्या धडक कारवाईनंतरही औषधांचा काळाबाजार सुरूच आहे, हे उल्हासनगरमधील महिलेच्या अटकेवरून पुन्हा एकदा उघड झालं आहे.

भाजप प्रदेशाध्यक्षांच्या नावे पैसे मागणारा अटकेत

पिंपरी : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नावाने रुग्णालयाकडे 25 लाखांची मागणी करणाऱ्याला निगडी पोलिसांनी गुरुवारी (ता. 23) पहाटे अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सौरभ संतोष अष्टुल (वय 21, रा. लोहियानगर, गल्ली क्रमांक 1, गंजपेठ, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी श्रीकृष्ण जोशी (रा. निगडी) यांनी निगडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. जोशी 18 जुलैला सायंकाळी चारच्या सुमारास निगडीतील खासगी रुग्णालयात असताना त्यांच्या मोबाईलवर आरोपीचा फोन आला. "मी चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयातून त्यांचा पीए सावंत बोलतोय, गरिबांच्या मदतीसाठी 25 लाखांची रक्कम आमच्या कार्यकर्त्याकडे पाठवून द्या, नाहीतर तुमचे हातपाय तोडून जिवे मारून टाकीन.' त्यानंतर जोशी यांनी तातडीने चंद्रकांत पाटील यांच्याकडे शहानिशा केली असता असा काहीच प्रकार नसल्याचे समोर आले. त्यानंतर जोशी यांनी तातडीने निगडी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला असता आरोपी पुण्यातील असल्याचे समोर आले.  सापळा रचून गुरुवारी पहाटे आरोपीला ताब्यात घेतले.

Edited by swarup jankar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com