जादा रकमेची वीजबिले मागे घेऊन नवी बिले द्या... 

जुन्या दराने बिल आकारणी केली नाही, तर वीजबिले जाळा आंदोलन केले जाईल, असा इशारा भाजपचे दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर यांनी दिला आहे.
mahavitarn.jpeg
mahavitarn.jpeg

मुंबई : बेस्ट विद्युत उपक्रमाद्वारे जानेवारीनंतर वाढविण्यात आलेल्या उर्जा शुल्कामुळे शहरवासियांना भरमसाठ वीजबिले येत आहेत. बेस्टने जानेवारीप्रमाणेच जुन्या दराने बिल आकारणी केली नाही, तर वीजबिले जाळा आंदोलन केले जाईल, असा इशारा भाजपचे दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर यांनी दिला आहे. 

जानेवारीपर्यंत शहरवासियांना कमी दराने वीजबिले येत होती, मात्र त्यानंतर बेस्टने एनर्जी चार्जेस वाढविल्याने आता गेले तीन महिने भरमसाठ बिले येत आहेत, असा आरोप शिरवडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात केला आहे. सध्या कोरोनाच्या फैलावामुळे सर्वच आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. लोकांकडे काम नसल्याने पैशांची आवक कमी झाली आहे व त्यामुळे घरगाडाही कोसळून पडला आहे. अशा स्थितीत ही वाढीव विजबिले तिप्पट चौपट रकमेची आल्याने ती भरणे लोकांना कठीण झाले आहे. 

नागरिकांच्या हलाखीच्या अवस्थेचा विचार करून केंद्र सरकारने नुकतेच गृहकर्जांचे हप्ते काही महिने पुढे ढकलले होते. तर राज्य सरकारने भाडेकरूंकडून तीन महिने घरभाडे न घेण्याचा आदेश घरमालकांना दिला होता. त्याचप्रमाणे सरकारने नागरिकांना दिलासा देण्यासाठी ही वीजबिलांची रक्कम कमी करावी, त्यासाठी वीजबिलांची रक्कम पूर्वीप्रमाणेच जानेवारीच्या दरांनुसार घेण्याचा आदेश बेस्ट ला द्यावा, असेही शिरवडकर यांनी या पत्रात म्हटले आहे. 

नुकतेच त्यांनी तसेच माटुंग्याच्या नगरसेविका राजश्री शिरवडकर यांनी एफ उत्तर (वडाळा) विभागाच्या अभियंत्यांनाही यासंदर्भात निवेदन दिले. राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनाही शिरवडकर यांनी या विषयावर पत्र पाठविले आहे. नवे उर्जाशुल्क रद्द करावे, तसेच आतापर्यंत पाठविलेली जादा रकमेची बिले मागे घेऊन नवी बिले द्यावीत. अन्यथा वीजबिल जाळा आंदोलन केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
Edited by : Mangesh Mahale


हेही वाचा : नितीन राऊत यांनी केलेल्या नियुक्त्या रद्द होणार
 
मुंबई : महामंडळाच वाटप अजूनही प्रलंबित असताना ऊर्जा खात्यातील संबंधित पारेषण, निर्मिती या कंपन्यांमधील संचालक मंडळावर अशासकीय सदस्यांची नेमणूक करण्यात आली. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी या नेमणुका केल्या आहेत. पण राष्ट्रवादी आणि शिवसेनेने या नेमणुकांना विरोध केला आहे. दरम्यान, या नियुक्त्या रद्द करण्यात येतील असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सूचीत केले आहे. राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडातील नाराजी नाट्य अधूनमधून डोके वर काढते. आता पुन्हा एकदा काँग्रेसची नाराजी समोर आली आहे. या संदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी नाराज आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. नाना पटोले, नितीन राऊत, सुनील केदार आदी या बैठकीस उपस्थित होते. महाआघाडीचे सरकार असताना काँग्रेसला मात्र निर्णय घेता येत नाहीत असा आक्षेप काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी नोंदवला होता. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि मंत्री अशोक चव्हाण यांनीही नाराजी व्यक्त केली होती. या नेत्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची बैठक घेऊन आपल्या भावनाही व्यक्त केल्या होत्या. मुख्यमंत्री कार्यालयाकडून केल्या जाणाऱ्या बदल्यांवरही काँग्रेस नेत्यांचे आक्षेप होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com