मराठवाडा पदवीधरमध्ये मतदानाचा टक्का वाढणार? बारापर्यंत २१ टक्के मतदान - Will the percentage of voting increase in Marathwada graduates? 21% turnout till 12 More about will | Politics Marathi News - Sarkarnama

मराठवाडा पदवीधरमध्ये मतदानाचा टक्का वाढणार? बारापर्यंत २१ टक्के मतदान

जगदीश पानसरे
मंगळवार, 1 डिसेंबर 2020

सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत हाती आलेल्या आकडेवारी नुसार मराठवाड्यात २०.७३ टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली आहे. ३ लाख ७३ हजार १६६ पैकी ७७ हजार ३५५ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता. यामध्ये पुरुष मतदारांचे प्रमाण २२.८७ तर महिलांचे १३.६७ टक्के इतके नाेंदवले गेले. परभणी जिल्ह्यात सर्वाधिक मतदानांची तर नांदेडमध्ये सर्वात कमी १७.८१ टक्के एवढे मतदान झाले होते.

औरंगाबाद ः मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी आज आठही जिल्ह्यात सकाळी आठ वाजेपासून मतदानाला सुरूवात झाली. काही जिल्ह्यांमध्ये सकाळापासूनच मतदानात उत्साह होता, तर काही भागात दहानंतर पदवीधर मतदारांच्या रांगा लागल्याचे दिसून आले. दुपारी १२ वाजेपर्यंतच्या आकडेवारी नूसार मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात २१ टक्के मतदानाची नाेंद झाली होती. सर्वाधिक मतदानाची नाेंद परभणीमध्ये २४.२४ टक्के एवढी झाली होती.

राज्यासह मराठवाड्यातील पदवीधर मतदारसंघासाठी आज मतदानाला सुरूवात झाली. महाविकास आघाडी विरुध्द भाजप अशी थेट लढत असलेल्या या निवडणुकीत सत्ताधारी व विरोधक या दोघांची देखील प्रतिष्ठापणा लागली आहे. गेली पंधरा दिवस मराठवाड्यात महाविकास आघाडी आणि भाजपच्या नेत्यांनी प्रचाराचा धुराळा उडवून दिला होता. ३५ उमेदवार या निवडणुकीत नशीब अजमावत असले तरी महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण आणि भाजप महायुतीचे शिरीष बोराळकर यांच्यात काटे की टक्कर होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

सकाळी काहीसे धिम्यागतीने सुरू झालेल्या मतदानात दहानंतर मात्र वेग आल्याचे पहायला मिळाले. सतीश चव्हाण, शिरीष बोराळकर या उमदेवारांनी सकाळीच मतदान करत शहरातील विविध केंद्रांना भेटी देत आढावा धेतला. या शिवाय औरंगाबासह मराठवाड्यातील महाविकास आघाडी व भाजपच्या आमदार, खासदार, लोकप्रतिनिधींनी देखील मतदानाचा हक्क बजावत मतदारांना बाहेर पडण्याचे आवाहन केले.

सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत हाती आलेल्या आकडेवारी नुसार मराठवाड्यात २०.७३ टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली आहे. ३ लाख ७३ हजार १६६ पैकी ७७ हजार ३५५ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता. यामध्ये पुरुष मतदारांचे प्रमाण २२.८७ तर महिलांचे १३.६७ टक्के इतके नाेंदवले गेले. परभणी जिल्ह्यात सर्वाधिक मतदानांची तर नांदेडमध्ये सर्वात कमी १७.८१ टक्के एवढे मतदान झाले होते. दुपारनंतर मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बारापर्यंत जिल्हानिहाय झालेले मतदान..

औरंगाबाद - २०.४८ टक्के

जालना - २२.५६ टक्के

परभणी - २४.२४ टक्के

हिंगोली - १८.५ टक्के

नांदेड - १७.८१ टक्के

लातूर - २१.८७ टक्के

उस्मानाबाद- २०.६४ टक्के

बीड- २१.१६ टक्के

एकूण -  २०.७३ 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख