शिवसेना खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल होईल का....नीलेश राणे यांचा सवाल...

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांचा मुलगा गीतेश राऊत यांनी कणकवली येथे ड्युटीवर असलेल्या पोलिसाला अश्लील भाषेत शिवीगाळ करून धमकी दिली आहे.
3Pune_Nilesh_Rane_Ready_anyt.jpg
3Pune_Nilesh_Rane_Ready_anyt.jpg

कणकवली :  शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांचा मुलगा गीतेश राऊत यांनी कणकवली  येथे ड्युटीवर असलेल्या पोलिसाला अश्लील भाषेत शिवीगाळ करून धमकी दिली आहे. याबाबत अजून पोलिसांनी कारवाई केलेली नाही, हेच का ठाकरे सरकार असे टि्वट माजी खासदास निलेश राणे यांनी केले आहे. या प्रकाराबाबत सोशल मीडियावर नाराजी व्यक्ती केली जात आहे. 

निलेश राणे आपल्या टि्वटमध्ये ठाकरे सरकारवर टिका केली आहे. "जवळपास 18 तास झाले तरीपण शिवसेना खासदार विनायक राऊतच्या मुलावर 353 व 185 नुसार गुन्हा दाखल झालेला नाही. जीव धोक्यात घालून कोरोनाच्या काळात पोलिस प्रमाणिक ड्युटी करतायेत पण त्यांच्या अंगावर दारू पिऊन खासदाराचा मुलगा भररस्त्यात धमकी देतो तरीही त्याला अटक होत नाही... हे ठाकरे सरकार," असे टि्वट निलेश राणे यांनी केले आहे. 

कणकवली शहराच्या मुख्य चैाकात आज सकाळी ही घटना घडली. कणकवली शहरात हायवेच्या पुलाचे काम सुरू असल्यामुळे गीतेश राऊत यांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे पोलिसांनी सांगितले होते. याचा राग गीतेश यांना आल्याने त्यांनी पोलिसाला  "मी तुला सोडणार नाही अशी धमकी देत अश्लील भाषेत केली शिवीगाळ केली असल्याचे समजते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. नेटिझन्सने गीतेश राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. 

"ही गाडी गीतेश त्यांच्या नावावर आहे. या  व्हिडोओमध्ये 'मी विनायक राऊत यांचा मुलगा आहे,' असे तो म्हणत  तो धमकी देत आहे. त्यांच्यावर अजून गुन्हा दाखल झालेला नाही, कारण तो खासदाराचा मुलगा आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे," असे नीलेश राणे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. या व्हिडिओमुळे राजकीय वातावरण तापले आहे. 
Edited by : Mangesh Mahale

हेही वाचा : "फडणवीस, तुमचे कौतुक तरी किती करावे ?..." 

पुणे : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील डॉक्टर, परिचारिका यांच्यावर विश्वास व्यक्त केला. आपल्याला काही झाले तरी हीच सरकारी यंत्रणा सुखरूप ठेवेल हा त्यांचा आत्मविश्वास सरकारला व हजारो कोरोनाग्रस्तांना बळ देणारा आहे. त्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक तरी किती करावे ? नव्हे, ते करायलाच हवे, असे गैारवउदगार सामनातून काढण्यात आले आहे. विरोधी पक्षनेते समाधानी आहेत. तशा त्यांच्या भावना त्यांनी मोकळेपणाने व्यक्त केल्या. राज्याच्या आरोग्य यंत्रणेला आणखी काय हवे, असा खोचक सवालही सामनातून करण्यात आला आहे. राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच माजी मंत्री गिरीश महाराज यांना सांगितले होते की ‘‘गिरीश, मला कोरोना वगैरे झालाच तर एक कर, मला काही झाले तरी सरकारी इस्पितळातच दाखल कर.’’ या फडणवीसाच्या विधानाचा समाचार सामनातून घेण्यात आला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com