भाषण रंगविण्यासाठी म्हटलो नाही तर लवकरच सीडी लावणार : खडसे 

खासदार डॉ. हिना गावीत, माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांनाच मी भाजपमध्ये आणले होते.
We will try to bring the CD before the public soon: Eknath Khadse
We will try to bring the CD before the public soon: Eknath Khadse

धुळे : माझ्या मागे "ईडी' लावाल, तर आम्ही "सीडी' लावू, असे मी भाषण रंगविण्याच्या हेतूने म्हटलेले नाही. खरोखरच सीडी लवकर जनतेसमोर आणण्याचा आमचा प्रयत्न असेल, त्यासाठी वाट पाहावी लागेल; पण सीडी नक्की आणू, असा पुनरुच्चार ज्येष्ठ नेते  एकनाथ खडसे यांनी केला. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये शुक्रवारी प्रवेशानंतर खडसे शनिवारी मोटारीने धुळेमार्गे जळगावला रवाना झाले. त्यांचा सायंकाळी साडेसहानंतर पुरमेपाडा (ता. धुळे) सीमेवर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष किरण पाटील, सुनील नेरकर, तालुकाध्यक्ष राजेंद्र चितोडकर, माजी जिल्हाध्यक्ष किरण पाटील, महिला जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा व कार्यकर्त्यांच्या हस्ते पहिला सत्कार करण्यात आला. 

त्यानंतर पारोळा चौफुलीवर शहराध्यक्ष रणजीत भोसले, सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत काटे, महेंद्र शिरसाट, महिला शहराध्यक्षांसह कार्यकर्त्यांच्या हस्ते सत्कार झाला. स्वागतासह खडसे यांना ठिकठिकाणी शहर व ग्रामीणच्या कार्यकर्त्यांनी अक्षरशः गराडा घातला होता. नंतर हॉटेल शांतिसागर येथे खडसे यांनी वार्तालाप करत विविध प्रश्‍नांना उत्तरे दिली. 

उत्तर महाराष्ट्रात वीस ते पंचवीस वर्षांपासून रखडलेल्या विकासाच्या विविध प्रकल्पांना गती देण्याचा प्रयत्न असेल. सिंचन प्रकल्पातील पाणी उपसा सिंचन योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पोहोचविण्यासाठी कटिबद्ध असेल, असे खडसे म्हणाले. 

पक्षांतरबंदी कायद्यामुळे इच्छा असूनही त्यांना येता येईना 

राष्ट्रवादीतील माझा पहिला दिवस आहे, असे सांगत खडसे यांनी नमूद केले की पक्षाच्या धुळे जिल्हाध्यक्षांशी बोलून जुन्या, नव्या, नाराज कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न असेल. त्यासाठी ते कार्यकर्ते माहीत करून घ्यावे लागतील. सध्या तरी पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले भाजपचे खासदार, आमदार, नगरसेवक माझ्या संपर्कात नाहीत. त्यांनी दूरध्वनीद्वारे माझे पक्ष प्रवेशाबाबत अभिनंदन जरी केले तरी त्यांना पक्षांतर बंदी कायद्यामुळे इच्छा असूनही राष्ट्रवादीत येता येणार नाही. त्यामुळे ते फुटण्याची शक्‍यता नाही. भविष्यात काय होईल माहीत नाही. मीदेखील राष्ट्रवादीत जाण्यापूर्वी सहा महिन्यांपासून प्रवेशासाठी पक्ष निवडीची चाचपणी करत होतो. 


शहाद्याच्या नगराध्यक्षांसह नगरसेवक संपर्कात 
राज्यातील भाजपचे 12 ते 13 माजी आमदार माझ्या संपर्कात असून ते राष्ट्रवादीत येण्याच्या स्थितीत आहेत. त्यांच्याशी बोलणे सुरू असल्याचे खडसे यांनी सांगितले. खासदार डॉ. हिना गावीत, माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांनाच मी भाजपमध्ये आणले होते. तसेच शिवसेनेतून खासदार डॉ. सुभाष भामरे यांना भाजपमध्ये आणले होते. त्यात पूर्वी राष्ट्रवादीत असणाऱ्यांना पुन्हा या पक्षात आणण्याचा प्रयत्न असेल. शहाद्याचे (जि. नंदुरबार) नगराध्यक्षच नव्हे; तर अनेक नगरसेवक माझ्या संपर्कात असल्याचे खडसे यांनी सांगितले. मंत्री छगन भुजबळ, माजी आमदार अनिल गोटे यांच्या साथीने ओबीसी चळवळीला गती देण्याचा, या घटकाला न्याय मिळवून देण्याचा माझा प्रयत्न असेल, असेही खडसे म्हणाले. 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com