आम्ही जास्त काळ विरोधात बसणार नाही, सत्तेत येणार; महाजनांचे संकेत  - We will not sit in opposition for long, we will come to power; Indications of Mahajan | Politics Marathi News - Sarkarnama

 आम्ही जास्त काळ विरोधात बसणार नाही, सत्तेत येणार; महाजनांचे संकेत 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 31 ऑक्टोबर 2020

महाजन यांच्या वक्तव्यामुळे राज्यातील सत्तेचे वेगळेच संकेत मिळत आहेत

जळगाव : आम्ही विरोधात जास्त काळ राहणार नाही,असा टोला राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांनी लगावला आहे. 

जळगावात ते बोलत होते. महाजन यांच्या वक्तव्यामुळे राज्यातील सत्तेचे वेगळेच संकेत मिळत आहेत.जळगाव येथे भारतीय जनता पक्षाच्या जिल्हास्तरीय कोआर कमिटीची बैठक भाजप कार्यालयात घेण्यात आली. या नंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 

फडणवीस विरोधात चागले काम करीत आहे, त्यांनी विरोधातच राहावे या सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना ते म्हणाले, विरोधात आम्ही जास्त काळ नाही हे सत्ताधारी नेत्यांनी लक्षात घ्यावे.यावेळी त्यांनी बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती दिली. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी भाजपतर्फे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. 

मराठा आरक्षणा बाबत सत्ताधारी गंभीर नसल्याचा आरोपही त्यांनी केला. आमच्या सत्ताकाळात या समितीत मी होतो. आरक्षण देण्यासाठी आम्ही गांभीर्याने बैठका घेतल्या चर्चा केल्या त्या मुळेच आम्ही आरक्षण देऊ शकलो परंतू ते टिकविण्यासाठी ही हे सत्ताधारी गंभीर दिसत नाहीत असा आरोपही त्यांनी केला. 

हे ही वाचा 

बीकॉमच्या निकालात विक्रमी वाढ 

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या बीकॉम सेमिस्टर-6 च्या निकालात यंदा विक्रमी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी बीकॉमच्या सहाव्या सत्राचा निकाल 60.31 टक्के लागला होता. यंदा बीकॉमच्या सहाव्या सत्राच्या परीक्षेचा निकाल 95.79 टक्के लागला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बीकॉम सत्र-6 चा निकाल 35.48 टक्‍क्‍यांनी वाढला आहे. कोरोनामुळे यंदा घेतलेल्या एम्सीक्‍यू पद्धतीचा विद्यार्थ्यांना फायदा झाल्याचे दिसते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख